पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेश बंदी

राज्य शासनाने जिल्हाधिकार्‍यांना कार्तिकी एकादशीला पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत.| Pandharpur Kartiki Ekadashi

  • Updated On - 5:27 pm, Fri, 8 January 21 Edited By: SachinP
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेश बंदी

सोलापूर: राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना  कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.  यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे, मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे. (State Govt decided to denied entry in Pandharpur for warkaris on Kartiki Ekadashi)

कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात.  राज्य शासनाने या सर्व सोहळ्यांना बंदी घातली आहे. कोरोना संसर्गामुळे आषाढी यात्रेनंतर कार्तिक वारी ही निर्बंधातच होणार आहे.

पंढरपूरसह परिसरातील गावांमध्ये संचारबंदी

कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) पंढरपूर (Pandharpur) शहरासह परिसरातील आठ ये दहा गावांमध्ये संचारबंदी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा बंद राहणार आहेत. 25 आणि 26 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये राहणार संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पंढरपूरमध्ये येणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 ते 26 नोव्हेंबर रोजी बाहेर गावातून पंढरपूर कडे येणारी सर्व एसटी वाहतूक बंद राहणार आहे. कार्तिक यात्रेच्या पाश्वर्भूमीवर प्रशासनाकडून वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (State Govt decided to denied entry in Pandharpur for warkaris on Kartiki Ekadashi)

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रशासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती

देशभरात कोविड 19 संसर्ग अजूनही आटोक्यात आला नाही. अशातच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आरोग्य संस्थानी व्यक्त केली आहे. २६ नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी आहे. आषाढी नंतर भरणारी ही मोठी वारी आहे. मात्र या यात्रेत गर्दी होऊन कोविड 19 संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी यात्रा सुध्दा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी. तसेच आषाढी यात्रा पध्दतीने नियम असावे असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. भाविकांनी मात्र कार्तिकी यात्रा रद्द न करता कोविडचे नियम घालून यात्रा करावी अशी मागणी केली होती. (Kartiki Ekadashi, Pandharpur)

वारकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच कार्तिकी वारीच्या निमित्तानं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.

दरम्यान, मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली धार्मिक स्थळ उघडण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली होती. राज्यातील मंदिर  16 नोव्हेंबरपासून उघडण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

PHOTO | पंढरपूर ते आळंदी, तुळजापूर-जेजुरीमध्ये मंदिरांच्या सफाईची लगबग, दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

(State Govt decided to denied entry in Pandharpur for warkaris on Kartiki Ekadashi)