AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भटक्या कुत्र्यांकडून चावा, तर मोकाट गायीचा हल्ला… राज्यातल्या दोन घटनांनी वाढवली चिंता

कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू असतानाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा असताना दुसरीकडे कुत्र्यांना पकडताना आणि त्यांची वाहतूक करताना योग्य पद्धतीने वागलं जातंय का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहे.

भटक्या कुत्र्यांकडून चावा, तर मोकाट गायीचा हल्ला... राज्यातल्या दोन घटनांनी वाढवली चिंता
भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2026 | 9:25 AM
Share

शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. एका बाजूला भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे मोकाट गायींच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत आहेत. कारंजा आणि धुळे इथं समोर आलेल्या दोन घटनांनी हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कारंजा शहरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्यानंतर नगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

कारंज्यात मोकाट कुत्र्यांच्या मोहिमेवरून वाद

याच पार्श्वभूमीवर अकोला इथल्या प्राणीप्रेमी सामाजिक संस्थेशी संबंधित काजल राऊत या पकडण्यात आलेल्या कुत्र्यांची माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागात आल्या होत्या. मात्र, अकोल्याला परत जात असताना सिंधी कॅम्प परिसरात त्यांना दोन व्यक्ती मोटारसायकलवरून एका कुत्र्याला नायलॉनच्या दोरीने बांधून नेताना दिसले. कुत्र्याला अशा पद्धतीने नेलं जात असल्याचं पाहून काजल राऊत संतापल्या. त्यानंतर संबंधित व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. या वादादरम्यान त्यांनी त्या व्यक्तीला चापट मारत शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

धुळ्यात मोकाट गायीचा महिला आणि दोन मुलांवर हल्ला

दुसरीकडे, धुळ्यातील गरुड कॉलनी आणि जयहिंद कॉलनी परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून एका मोकाट गायीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सायंकाळच्या सुमारास गरुड कॉलनीतील साकार ग्लास हाऊसजवळ एक महिला आपल्या दोन मुलांसह स्कूटरवरून घरी जात होती. त्यावेळी मोकाट गायीने त्यांच्या चालत्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे महिला आणि दोन्ही मुलं रस्त्यावर कोसळली. त्यानंतर गायीने पाच वर्षांच्या मुलाला शिंगाने उचलून फेकल्याने तो जखमी झाला. महिलेच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर सात वर्षांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या दोन्ही घटनांमुळे मोकाट कुत्रे आणि जनावरांपासून नागरिकांची सुरक्षा, तसंच त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना प्राणी कल्याणाच्या नियमांचं पालन करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाने नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांशी होणारी वागणूक या दोन्ही बाबींचा समतोल राखत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा