
मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यातील कोंढवा भागात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. , “जे लोकं मुलींवर हात उचलतील त्यांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजेत कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. हे राज्य असं नाही की कोणीही मुलींवर हात टाकू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत महाविद्यालयात पाठवत असाल पण एक लक्षात ठेवा आपली जरी सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत, त्यामुळे तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला घाबरू नका, असं यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?
मला खर तर विद्यार्थी सेनेचे खूप आभार मानायचे आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचं माझं स्वप्न तुम्ही साकार करत आहात, विद्यार्थ्यांशी बोलायला मी फार लहान आहे. मला वाटतं शाळेत जाणार प्रत्येक मुल, मुलगा किंवा मुलगी सुरक्षित असावेत. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आम्ही तुमच्यासोबत आहोतच, माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे, असं यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. “जे लोकं मुलींवर हात उचलतील त्यांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजेत, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. हे राज्य असं नाही की कोणीही मुलींवर हात टाकू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत महाविद्यालयात पाठवत असाल पण एक लक्षात ठेवा आपली जरी सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत. मी पालकांशी बोलायला आलो आहे. की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत.” असं यावेळी अमित ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.