ऊसतोड महिला कामगार आता गावचा कारभार हाकणार, चिखलीच्या ग्रामस्थांचा मतरुपी निकाल!

नांदेडच्या कंधारमधील चिखली गावातील रेखा गायकवाड या उसतोड महिलेला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलंय.

ऊसतोड महिला कामगार आता गावचा कारभार हाकणार, चिखलीच्या ग्रामस्थांचा मतरुपी निकाल!
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 1:19 PM

नांदेड : निवडणूक म्हणजे वारेमाप खर्च असा सगळ्यांचा समज आहे. मात्र नांदेडमध्ये चिखली गावात ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालीय. एक नवा पैसा ही खर्च न करता ऊसतोड तोडणाऱ्या रेखा गायकवाड ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

जनमत पाठीशी असले की निवडणुका इतिहास घडवतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. नांदेड जिल्ह्यातील चिखली हे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मूळ गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत खासदार चिखलीकर यांच्या गटाकडे आहे. मात्र याच गावात खासदारांच्या विरोधी गटांकडून विजयी झालेल्या रेखा बाबुराव गायकवाड यांच्या विजयाची देखील चर्चा होतेय.

व्यवसायाने ऊसतोड कामगार महिला असलेल्या रेखा गायकवाड यांना चिखली गावकऱ्यांनी निवडून दिलंय. विशेष म्हणजे या गावचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेला सुटले तर त्या सरपंचपदाच्या एकमेव दावेदार आहेत.

निवडणुकीला पैसाच खर्च करावा लागतो, असा समज या उदाहरणामुळे दूर होतो. गावकरी ज्याच्या पाठीशी त्याला नेतृत्व करायची संधी मिळते, हे या निमित्ताने सिद्ध होतंय. एक ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायतीत जाऊन आपल्या गावाच्या प्रश्नांना वाचा फोडणार याचा चिखली इथल्या ग्रामस्थांना अभिमान आहे.

सोलापुरचा 21 वर्षांचा ऋतुराज हाकणार गावगाडा

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात घाटणे येथील 21 वर्षाचा तरुणही विजयी झालाय. यासह तो सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरलाय. ऋतुराज रवींद्र देशमुख असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या पॅनललाही मोठा विजय मिळालाय. आता सरपंचपदाचं आरक्षण सोडतीनंतर त्याला संधी मिळाली, तर तो सर्वात तरुण सरपंच होण्याचीही शक्यता आहे

(SugarCane Worker Women Become A nanded Gram panchayat member)

हे ही वाचा :

अशी निवडणूक जिथं एक पॅनल प्रमुख पडला, एक पडता पडता राहीला, एकाची बायको पडली, एका मतानं उमेदवार पडला

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एमबीए शिकलेला तरुण बनला ग्रामपंचायत सदस्य; गावात घडवलं सत्तांतर

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.