ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केला. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज वेगळा ठरला.
या तरुणाने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ‘लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनल’ उभा करुन निवडणूक लढवली. ऋतुराजने ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जण विजयी झाले. स्वतः ऋतुराजला 103 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधातील उमेदवाराला 66 मतं मिळाली. सदस्य म्हणून निवडून आलेल्या ऋतुराजला सरपंचपद भूषवण्याची संधीही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व आरक्षण सोडतीवरच अवलंबून असणार आहे. आरक्षणाच्या सोडतीनंतर त्याला संधी मिळाली, तर सोलापूरचा ऋतुराज राज्यातील सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरेल.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :