AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय, राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, विजयाचं श्रेय कोणाला? शशिकांत शिंदे यांचं मोठं विधान

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय झाला आहे. त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय, राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, विजयाचं श्रेय कोणाला? शशिकांत शिंदे यांचं मोठं विधान
Shashikant ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 3:15 PM
Share

अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडली. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर आता या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यातील विजयाचे सर्व विक्रम सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.  सुनेत्रा पवार या तब्बल  २,१८,९३० एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार या विजयी झाल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे? 

सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाल्या आहेत. त्यांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या विजयावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनेत्रा पवार या निवडून येणारच होत्या, त्यात काही शंका नव्हती. प्रचारामध्ये सुप्रिया सुळे होत्या, रोहित पवार होते. सुनेत्रा पवार यांचा या निवडणुकीत विजय होणार हे निश्चित होतं, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे, राज्यात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये देखील भाजपची सत्ता आली आहे. केरळमध्ये डाव्यांना धक्का बसला असून, काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. यावर देखील शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं मत एवढंच आहे,  जनतेचा कौल मानावा लागतो. जे लढताय त्यांचं कौतुक करायला पाहिजे. निवडून येण्याचे सूत्र बदलले नाही,  काही मोठे पक्ष ठरवतात, पॉलिसी असते. परंतु सध्या विरोधक संपवून टाकायचं धोरण आहे.  त्या पद्धतीने निवडणूक झाल्या आहेत.  मतमोजणी चालू आहे, निकाल जाहीर झाल्यावर भाष्य करू, असं यावेळी शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी