Shivsena : होय त्यात शंकाच नाही; आमदार फुटीवर युक्तिवाद सुरू असतानाच कोर्टाचं महत्त्वाचं भाष्य; शिवसेना फुटीवर सुप्रिम कोर्टात काय घडलं?

समजा पाच पैकी तीन आमदार फुटले तर तो पक्षच त्यांचा होणार का? असा सवालही त्यांनी केला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे झाले तर राजकीय पक्षाचे महत्त्व जास्त आहे. सादिक अली केसमध्येही याबाबतचे निरीक्षण स्पष्टपणे नोंदवलेलं आहे, असं देवदत्त कामत म्हणाले.

Shivsena : होय त्यात शंकाच नाही; आमदार फुटीवर युक्तिवाद सुरू असतानाच कोर्टाचं महत्त्वाचं भाष्य; शिवसेना फुटीवर सुप्रिम कोर्टात काय घडलं?
shivsena supreme court hearing
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2026 | 3:50 PM

 Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नेमका कोणाचा यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गट आपली बाजू मांडत आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या संपला आहे. त्यांनी आम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार नसेल तर ते गोठवावे, अशी मोठी मागणी केली आहे. त्यानंतर आता वकील देवदत्त कामत हेदेखील ठाकरे यांच्याच बाजूने आज युक्तिवाद करत आहेत. त्यांनी आपल्या युक्तिवादाच्या सुरुवातीला आमदारफुटीवर भाष्य केले. युक्तिवाद सुरू असताना न्यायालयाने महत्त्वाचे भाष्य केले.

कामत काय म्हणाले?

देवदत्त कामत यांनी ठाकरे यांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी युक्तिवादात अनेक जुन्या खटल्यांचा संदर्भ दिला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला देऊन टाकले. परंतु आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याआधीच हा निर्णय घेण्यात आला. तेव्हा बंडखोरी केलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपलेला आहे. परंतु त्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय होणं गरजेचं आहे, असे मत यावेली देवदत्त कामत यांनी व्यक्त केले.

….तर राजकीय पक्षाचे महत्त्व जास्त

तसेच, समजा पाच पैकी तीन आमदार फुटले तर तो पक्षच त्यांचा होणार का? असा सवालही त्यांनी केला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे झाले तर राजकीय पक्षाचे महत्त्व जास्त आहे. सादिक अली केसमध्येही याबाबतचे निरीक्षण स्पष्टपणे नोंदवलेलं आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. परंतु यासाठी कोणता आधार घेण्यात आला, हे एकदा पाहायला हवे, अशी विनंती कामत यांनी न्यायालयाला केली.

आमदार अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा आमच्याकडे अधिकार

कामत यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानेही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. आमच्याकडे आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक चिन्हाविषयी निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे अधिकार आहेत, यात शंका नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. त्यामुळे आता न्यायालय आमदारांची अपात्रता तसेच निवडणूक चिन्हाविषयी काय निर्णय घेणार, ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us