VIDEO सुप्रिया सुळेंचा हलगीवर ठेका

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाषणबाजीसह, विविध क्लृप्त्या लढवत आहेत. नेतेमंडळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दौंडमधील  खामगाव इथे ग्रामदैवताच्या यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत रंगपंचमीही साजरी केली. शिवाय झांज वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यानंतर प्रचार दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी हलगीच्या तालावर नृत्य केलं. …

VIDEO सुप्रिया सुळेंचा हलगीवर ठेका

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाषणबाजीसह, विविध क्लृप्त्या लढवत आहेत. नेतेमंडळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दौंडमधील  खामगाव इथे ग्रामदैवताच्या यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली.

यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत रंगपंचमीही साजरी केली. शिवाय झांज वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला.

त्यानंतर प्रचार दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी हलगीच्या तालावर नृत्य केलं. स्थानिक महिलांसमवेत रंगपंचमी साजरी करत, सुप्रियांनी हलगीच्या तालावर ठेका धरला. यावेळी सुप्रिया सुळेंनी हातात झांज घेत, हलगीच्या तालावर स्वत: ठेका धरला.

सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात काँटे की टक्कर आहे.

VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *