AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरेंची उपस्थिती, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला वाटतं..

Supriya Sule : अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या विषयात त्या म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोठी चौकशी सुरु आहे. रिपोर्ट आल्याशिवाय यावर बोलणं योग्य नाही"

Supriya Sule : मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरेंची उपस्थिती, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला वाटतं..
Supriya Sule
| Updated on: Mar 30, 2026 | 11:50 AM
Share

“सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्याची जाणीव आहे. मागच्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी सहकार्याची भूमिका आम्ही घेतली. देश अडचणीत असेल सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचं असेल, तर सरकारने पारदर्शकपणे अडचण आहे हे मान्य करावं लागेल. लोढा यांनी पत्र लिहिलं. लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आभार मानते मी त्यांचे” असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भुजबळ म्हणतात पीएनजी कनेक्शन घ्या. तीन महिन्यांनी सिलिंडर मिळणार नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कनेक्शन द्या आमची तयारी आहे. सरकारने कनेक्शन द्यावं आम्हाला. तुम्ही मायबाप सरकार आहात. तुम्ही कनेक्शन द्या. आम्ही तयार आहोत. आम्हाला कनेक्शन मिळाल्याशी मतलब” शिवसेनेची भूमिका बदलत आहे. उद्धव ठाकरे यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा दिला आहे. निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला गेले. या प्रश्नावर सुप्रिया सुळे बोलल्या की, “मला वाटतं तुमची गल्लत होतेय. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे विषय आहेत. कोणी कोणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेलं त्यात गैर काय?. हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे”

मतभेद असावेत, मनभेद असू नयेत

“मी ज्या संस्कारात वाढले तिथे विरोधकाला शत्रू मानत नाही. मतभेद असावेत, मनभेद असू नयेत. मनभेद, शत्रू हे शब्द लोकशाहीत बसत नाहीत. कोणी कोणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेलं, त्यात काय एवढं बोलण्यासारखं. देशासमोर अनेक मोठी आव्हान आहेत. महागाई, डिझेल असे अनेक मुद्दे आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही कारवाई केली पाहिजे

या प्रकरणात महिलांचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत, त्यावर सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या. “मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, मीडियामधून हा जो मुद्दा मांडला जातोय तो महत्वाचा आहे. महिलांचे फोटो बाहेर जाऊ नयेत. एक नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, तुम्ही कारवाई केली पाहिजे. मीडियाने या विषयात जो संवेदनशीलपणा दाखवला त्यासाठी आभार मानते”

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...