एकनाथ शिंदे अडचणीत? सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप, थेट म्हणाल्या..

सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे, यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.

एकनाथ शिंदे अडचणीत? सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप, थेट म्हणाल्या..
अंधारे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 18, 2025 | 6:18 PM

मोठी बातमी समोर येत आहे,  सातारा ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे. आरोपींना एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या हॉटेलमधून जेवन मागवण्यात आलं, असा आरोप अंधारे यांनी केला आहे. हॉटेल तेजयश हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचं असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. अंधारे यांनी गुगल मॅप आणि हॉट्सअ‍ॅप लिंकचा लाईव्ह डेमो दाखवत प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. तर दुसरीकेड मात्र या प्रकरणात अंधारे यांनी माफी मागावी अन्यथा कारवाई करून असा इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

अंधारे यांनी हॉट्सअ‍ॅप दाखवत  म्हटलं की,  या रेसॉर्टचा यामध्ये बान दाखवण्यात आला आहे. आता यामध्ये हे विशेष आहे, यावर आपण क्लिक करून पाहूयात, हॉट्सअपला आपण क्लिक केलं, आता ऑनलाईन बुकिंगला गेलो. आता त्यावर नाव काय आहे ते बघा, प्रकाश शिंदे असं नाव येत आहे यावर, हे आहे हॉटेल तेजयश, हे त्यांच्या दोन्ही मुलांचं नाव आहे. मग आता  देखील प्रकाश शिंदे खोट बोलणार का? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे. मी पुन्हा एकदा सांगते मी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करते असं अंधारे यांनी म्हटलं आहे. माझा सरळ साधा प्रश्न आहे, जर एखाद्या ठिकाणी मंत्रि‍पदाच्या प्रिविलेजमुळे एखादा व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत, असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात निवडणुका सुरू आहेत, नगर पालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे, तसेच अंधारे यांनी माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा देखील शंभुराज देसाई यांच्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान शंभुराज देसाई यांच्या या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे.   जिल्ह्याला कोकेणचा विळखा पडलेला असताना पालकमंत्री काय करत आहेत? असा सवालही यावेळी अंधारे यांनी केला आहे, मी पुरावे दिले आहेत, मग तुम्ही मला धमक्या का देत आहात, मी केस टाकतो म्हणून? विरोधकांचं काम आहे, तुम्हाला प्रश्न विचारणं, ते आम्ही करत आहोत. तो आमचा अधिकार आहे, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, असं अंधारे यांनी म्हटलं.