AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, वेगावान घडामोडी, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, आता या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, वेगावान घडामोडी, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी
महायुती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 18, 2025 | 4:27 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 23 डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 15 जानेवारी 2025 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, 16 जानेवारी 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे, राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर वसंत स्मृती भवन इथे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये भाजपने जागा वाटपासंदर्भात शिवसेना शिंदे गटाची गोची केल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून  227 जागांपैकी निम्म्या जागांवर या बैठकीमध्ये दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  मात्र दुसरीकडे या बैठकीमध्ये भाजपकडून गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवरही भाजपकडून दावा करण्याची आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

भाजपने 2017 साली जिंकलेल्या 82 प्रभागांवरील दावा कायम ठेवला आहे. याशिवाय, 2017 साली बंडखोरीमुळे पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांना पडलेली मते आणि बंडखोर उमेदवाराला मिळालेली मते तेथील शिवसेनेच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त असतील तर त्या जागेवरही भाजपकडून दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मात्र  2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाल्याने शिवसेना शिंदे गटाने भाजपचा दावा खोडून काढल्याची माहीती आहे.  2014 च्या आधारावर जागा वाटप करणे योग्य नाही. त्यावेळची आकडेवारी आताच्या जागावाटपासाठी योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं या बैठकीत मांडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होणार आहे, तर पुण्यात मात्र भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे, पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप हे महायुतीमधील दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहेत.

जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.