AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा आयकरचा धोका मोठा; ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं शिंदेंना डिवचलं

आज संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली, यावरून सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा आयकरचा धोका मोठा; ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं शिंदेंना डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2025 | 6:17 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट  यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे, त्याचसोबत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीमध्ये जोरदार राडा केला होता, त्यांनी शिळे आणि खराब जेवण दिल्याचा आरोप करत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. शिंदेंच्या मंत्र्याला आलेली आयकर विभागाची नोटीस आणि संजय गायकवाड यांचं प्रकरण यावरून आता सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अंधारे नेमकं काय म्हणाल्या? 

संजय शिरसाट आणि संजय गायकवाड या दोघांनी शिवसेना शिंदे गटाची चव घालवली,  गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या समाधीस्थळी असायला हेवे होते. दिघेंच्या आश्रमामध्ये असायला हवे होते, मात्र ते दिल्लीत आहेत, याचाच अर्थ गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा इन्कम टॅक्सचा धोका मोठा आहे का? असा खोचक सवाल अंधारे यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे ज्या दिवशी जय गुजरात म्हणाले त्याच दिवशी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची नाळ तोडून टाकली असा टोलाही यावेळी अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

संजय शिरसाट यांना नोटीस

मंत्री संजय सिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.  उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारीवरून संजय शिरसाट यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील व्हिट्स हॉटेल प्रकरणी विरोधकांनी शिरसाट यांच्यावर आरोप केले होते, त्यानंतर त्यांच्या मुलानं टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली, मात्र त्याच प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानं संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, यावरूनच आता अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!