आता माघार नाही; पिंपरीत ६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

| Updated on: Nov 13, 2021 | 1:50 PM

महामंडळ प्रशासनाने कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस हातात न देता, कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई केली आहे. केवळ संप मोडीत काढण्यासाठी शासनाने सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. रोज थोड्या थोड्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यापेक्षा सर्वांवर एकाच वेळी कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आता माघार नाही; पिंपरीत ६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

पिंपरी – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्येही मागील पाच दिवसांपासून कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. आज संपाच्या सहाव्या दिवशीही कामगांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर आगारात आंदोलन करणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सूडबुद्धीतून प्रशासन ही कारवाई करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सर्वांचेच निलंबन करा
महामंडळ प्रशासनाने कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस हातात न देता, कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई केली आहे. केवळ संप मोडीत काढण्यासाठी शासनाने सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. रोज थोड्या थोड्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यापेक्षा सर्वांवर एकाच वेळी कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

पुण्यातील स्वारगेट आगाराच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका सरकारने घेतली आहे. संपात सहभागी झालेला एकही कर्मचारी कामावर परतलेला नाही. संपात फूट पाडण्यासाठी महामंडळाने खासगी वाहक व चालकांच्या मदतीने स्वारगेट व शिवाजीनगर आगारातून शिवनेरीची वाहतूक सुरु केली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी आश्वासन दिल्यानंतर कालपासून खासगी बसेसची वाहतूकही सुरु झाली आहे.

राज्यात डेपो बाहेर निदर्शने
आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत सहभागे झाले आहेत. आज महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोच्या बाहेर निदर्शने करावीत, असे आवाहन शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केले आहे. याबरोबरच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चर्चेच्या निमंत्रणाची वाट बघत असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

Corona Patients increasing | पुणेकरांनो काळजी घ्या ; दिवाळीनंतर वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठयांचे पद रद्द करा ; राज्य महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक