यवतमाळमध्ये कोल्हापूर पॅटर्न, मटणाचे दर नियंत्रित करा, मटणप्रेमींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

स्वाभिमान कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर दर नियंत्रित करण्याची मागणी केली आहे. Swamibhan Kamgar Sanghtna Meat rates

यवतमाळमध्ये कोल्हापूर पॅटर्न, मटणाचे दर नियंत्रित करा, मटणप्रेमींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना मटण दर नियंत्रित करण्यासाठी निवेदन देण्यात आलं

यवतमाळ: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचं संकट आल्यामुळे खवय्यांनी मटणाकडे मोर्चा वळवला आहे. मांसाहरी लोक चिकन आणि अंडी यांच्याऐवजी मटणाला पसंती देताना दिसत आहेत. मटणाचे भाव वाढलेले भाव कमी करण्यासाठी यवतमाळमध्ये कोल्हापूर पॅटर्न वापरण्यात आला आहे. यवतमाळमधील स्वाभिमान कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर दर नियंत्रित करण्याची मागणी केली आहे. (Swamibhan Kamgar Sanghtna Demands Collector should control Meat rates)

अव्वाच्या सव्वा वाढलेले मटणाचे दर नियंत्रित करा

बर्ड फ्लू सारख्या आजारमुळे अनेक ठिकाणी चिकन ऐवजी नागरिकांचा मटण खाण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. मटण विक्रेते या संधीचा गैरफायदा घेत आहेत, असा आरोप मटण प्रेमींनी केला आहे. शेतकरी आणि बचत गट यांच्या कडून कमी दरात बोकड खरेदी करून मटण मात्र अव्वाच्या सव्वा दर म्हणजे 700 ते 800 रुपये किलोने विक्री केली जात आहे. मटण खाणाऱ्या ग्राहकांची लूट थांबवावी अशी मागणी मटण प्रेमींनी केली आहे.

स्वाभिमान कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूरच्या धर्तीवर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मटणाचे दर नियंत्रित करावेत, अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटेनेचे निरज वाघमारे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मटणप्रेमी आणि स्वाभिमान कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यवतमाळ मध्ये 800 रुपयांना 1 किलो या प्रमाणे मटण विक्रेते मटण विक्री करत असून सामान्य ग्राहकाची ही लूट आहे त्यामुळे लूट थांबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

‘चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना होत नाही’

देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरले अशा बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिकन आणि अंड्यांकडे पाठ फिरवली आहे. मात्र, चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे चिकन किंवा अंडी खाल्याने बर्ड फ्लू माणसांना होत नाही हे उघड झालं आहे

संबंधित बातम्या:

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

(Swamibhan Kamgar Sanghtna Demands Collector should control Meat rates)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI