AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teera Kamat : कामत कुटुंबियांना मोठा दिलासा, तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत राज्य सरकारचं पत्र

SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं कामत कुटुंबियांना एक पत्र दिलं आहे.

Teera Kamat : कामत कुटुंबियांना मोठा दिलासा, तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत राज्य सरकारचं पत्र
तीरा कामत
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 08, 2021 | 6:16 PM
Share

मुंबई : स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं कामत कुटुंबियांना एक पत्र दिलं आहे. असं असलं तरी हे औषध भारतात येण्यासाठी अजून 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं उचललेलं हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे. त्यामुळे तीराच्या आई-वडिलांवर असलेल्या जवळपास 5 कोटी रुपये जमा करण्याचा ताण हलका होणार आहे.(State Government’s letter for waiver of customs duty on Tira Kamat medicine)

5 महिन्यांच्या चिमुकल्या तीरावर सध्या तिच्या अंधेरीतील घरी पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तीराची प्रकृती स्थित असल्याची माहिती तिच्या कुंटुंबियांनी दिली आहे. दरम्यान, चिमुकलीच्या रक्ताचा एक अहवाल येणं अद्याप बाकी आहे. तो अहवाल पुढील 2 – 3 दिवसांत आल्यानंतर तीराला औषध मिळणं शक्य होणार आहे.

लेकीसाठी आई-वडिलांची धडपड

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दुर्धर आजार आहे. तीरा कामत या चिमुकलीला हा आजार झाल्याचं लक्षात आल्यानंतर आपल्या लेकीला वाचवायचं आहे. तिला हे जग दाखवायचं आहे, असा मनाशी निश्चय करुन तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडला. त्यासाठी कामत कुटुंबियांना अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी मदत केली. त्यातून तब्बल 16 कोटी रुपयांची रक्कमही उभा केली. पण एक वेगळीच अडचण या कुटुंबियांसमोर उभी राहिली होती. कारण, अमेरिकेतून हे औषध भारतात आणण्यासाठी कस्टम ड्यूटी अर्थात सीमा शुल्क लागणार आहे. त्यासाठी थोडेथोडके नाही तर 2 ते ५ कोटी रुपये लागणार होते. त्यामुळे कामत कुटुंबाने हे सीमा शुल्क माफ करण्याची विनंती राज्य आणि केंद्र सरकारला केली होती.

अखेर राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं त्या चिमुकलीच्या जीव वाचवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं आहे. त्याबाबतचं एक पत्र आरोग्य विभागानं कामत कुटुंबाला सोमवारी पाठवलं आहे. आता हे पत्र कामत कुटुंब संबंधित औषध कंपनीला पाठवणार आहे. या पत्राच्या आधारे तीराच्या औषधावरील कर माफ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कामत कुटुंबाला राज्य सरकारच्या या पत्राद्वारे मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी?

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होत जाते. त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्नायुंचं काम कमी होऊन गिळताना अडचण निर्माण होते. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणंही कठीण बनतं. रुग्ण एकप्रकारे रेस्पिरेटरी पॅरलेलिससमध्ये जातो. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो.

संबंधित बातम्या :

Teera kamat : चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16 कोटी उभारले! सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर, आई-वडिलांची धडपड सुरुच

Dieting side Effects | वजन कमी करण्यासाठी ‘डाएटिंग’ करताय? सावधान! आधी हे दुष्परिणाम वाचाच…

State Government’s letter for waiver of customs duty on Tira Kamat medicine

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी