AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाची कारवाई, 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश

 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत तर इतर 16 पुजाऱ्यांना 6 महिनेसाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाची कारवाई, 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश
| Edited By: | Updated on: Jan 05, 2021 | 8:08 PM
Share

उस्मानाबाद : कोरोना नियमांचे उल्लंघन आणि गैरवर्तन केल्याने तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यावर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कारवाई केली आहे. 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत तर इतर 16 पुजाऱ्यांना 6 महिनेसाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Temple administration takes action against 24 priests of Goddess Tulja Bhavani)

कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. पुजारी अभिजीत कुतवळ, कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले, ओंकार भिसे व आकाश परदेशी या 8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली असून 6 महिने मंदिर प्रवेश बंदी का वाढवू नये अशी नोटीस बजावली आहे.

मंदिरात पूजेची पाळी नसतानाही तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विनापरवाना प्रवेश केल्या प्रकरणी 16 पुजाऱ्यांना 6 महिने मंदिर प्रवेश का करू नये अशी नोटीस बजावली असून यात सत्यजित कदम, विशाल सोंजी, शशिकांत पाटील, अक्षय कदम, अथर्व कदम, शशिकांत कदम- परमेश्वर, बुवासाहेब पाटील, सौरभ कदम- परमेश्वर, सुहास कदम, आकाश कदम, आनंद पाटील, नेताजी पाटील, विशाल पाटील, दिनेश परमेश्वर, सार्थक मलबा व सुहास कदम यांचा समावेश आहे.

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही पुजारी मंडळाची बैठक संपन्न झाली. त्यात पुजाऱ्यांना मंदिराचे उत्तर बाजूकडील भवानी शंकर गेटद्वारे गाभाऱ्यात प्रवेश देण्याचे ठरले. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाकंभरी नवरात्र उत्सवात उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्याचे बैठकीत ठरल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली. तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 13 जानेवारी पासून सुरु 23 जानेवारीपासून विविध अलंकार पूजा होणार आहेत. (Temple administration takes action against 24 priests of Goddess Tulja Bhavani)

आता महाराष्ट्रातही Sea Plane प्रवासाची संधी, मुंबई-शिर्डीसह ‘या’ मार्गावर लवकरच सेवा सुरु होणार

(Temple administration takes action against 24 priests of Goddess Tulja Bhavani)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.