AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता महाराष्ट्रातही Sea Plane प्रवासाची संधी, मुंबई-शिर्डीसह ‘या’ मार्गावर लवकरच सेवा सुरु होणार

सीप्लेनमधून (Sea Plane) प्रवास करणे हा हवाई प्रवासाचा एक वेगळाच अनुभव आहे. नदी किंवा समुद्रातून होणारं विमानाचं उड्डाण अंगावर काटा उभा करतं.

आता महाराष्ट्रातही Sea Plane प्रवासाची संधी, मुंबई-शिर्डीसह 'या' मार्गावर लवकरच सेवा सुरु होणार
| Updated on: Jan 02, 2021 | 6:45 PM
Share

नवी दिल्ली : सीप्लेनमधून (Sea Plane) प्रवास करणे हा हवाई प्रवासाचा एक वेगळाच अनुभव आहे. नदी किंवा समुद्रातून होणारं विमानाचं उड्डाण अंगावर काटा उभा करतं. हा अनुभव सध्या भारतात अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर सुरु आहे. या प्रवासात देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उच्च पुतळा म्हणजेच “स्टॅच्यु ऑफ युनिटी” देखी पाहायला मिळतो. हा अनुभव घेणं अनेकांचं स्वप्न आहे. मात्र, आता महाराष्ट्रासह देशभरात अशी सेवा सुरु होणार आहे. केंद्र सरकार यावर काम करत आहे. महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ही सेवा सुरु केली जाणार आहे (Know all about UDAN project seaplane to start from Mumbai to Shirdi and other places of country).

देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचं (Seaplane Service) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये केलं होतं ही सेवा अहमदाबादच्या साबरमती नदीकिनाऱ्यावरुन केवडिया दरम्यान आहे. आता आगामी काळात देशात अशाप्रकारे अनेक ठिकाणी सीप्लेन सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. यात दिल्ली-युमना रिव्हर फ्रंट-अयोध्या, मुंबई-शिर्डीसह अनेक मार्गांचा विचार सुरु आहे.

केंद्र सरकारच्या जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी (SSPS) कंपन्यांचे प्रस्ताव (EoI) मागवले आहेत. यात दिल्लीच्या यमुना नदी किनाऱ्यापासून अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) आणि चंडीगड, मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सूरत ते द्वारका, मांडवी आणि कांडलासह अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप समुहासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. इच्छुक कंपन्यांना 22 जानेवारी 2021 पर्यंत केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेवर प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

कोणत्या मार्गावर सेवा सुरु होणार?

1. दिल्लीहून अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) 2. तेथून पुढे बद्रीनाथ-केदारनाथ आणि चंडीगडपर्यंत 3. तेथून पुढे डलहौजीसह हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील अन्य पर्यटनस्थळांवर 4. मुंबईहून शिर्डी, गणपतीपुळे, लोणावळा आणि इतर पर्यटनस्थळांसाठी. 5. सूरतहून द्वारका, मांडवी आणि कांडलापर्यंत.

अहमदाबाद रिव्हर फ्रंटवरुन केवडियापर्यंत सी-प्लेन सेवा देणारी कंपनी स्पाईसजेट ही आहे. यासाठी स्पाईसजेटने 15 आसनव्यवस्था असलेलं ट्विन ओटेर 300 एअरक्राफ्टची व्यवस्था केली आहे. हे विमान जगभरात सर्वाधिक उपयोगी मानलं जातं. हे विमान त्यांच्या वेगळेपणासाठी आणि सुरक्षिततेसाठी देखील ओळखलं जातं. या विमानाची बनावट, पेलोड क्षमता, शॉर्ट टेक ऑफ या गोष्टी देखील विशेष आहेत. आगामी मार्गावरील सेवेसाठी देखील सरकारने याच प्रकारची सेवा देण्याबाबत प्रस्ताव मागितले आहेत.

हेही वाचा :

नववर्षाच्या स्वागतला बाहेर जायचंय, मग तळकोकणातील ‘हे’ निसर्ग सौदर्य पाहिलंय का?

कोरोना, लॉकडाऊन अशा शब्दांनी वैतागलाय, मग कोकणातील हे ‘तुंबाड’ ठिकाण पाहाच…

राज्य अनलॉक, आता पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार : आदित्य ठाकरे

Know all about UDAN project seaplane to start from Mumbai to Shirdi and other places of country

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.