AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, पोलिस दाखल, थेट..

ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी शिवसैनिक जमत आहेत. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक येत असल्याने तणाव वाढताना दिसत आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, पोलिस दाखल, थेट..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 20, 2026 | 5:03 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभा अध्यक्षांना एक पत्र 6 खासदारांकडून देण्यात आले. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापैकी एक ओमराजे निंबाळकर आहेत. नुकताच ओमराजे निंबाळकर यांनी दोन ते तीन दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले. आपल्या मनातील खदखद त्यांनी काल बोलून दाखवली. पक्ष सोडण्याचा निर्णय नक्की का घ्यावा लागत आहे, हे देखील त्यांनी सांगितले. मात्र, आता ते मतदार संघात जाऊन निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल आज लागला आहे. सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता झाली. हा मोठा झटका ओमराजे निंबाळकर यांना आहे. कारण गेल्या 20 वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. त्यामध्येच कोर्टाने हा निर्णय घेतला.

दुसरीकडे सुनावणी सुरू असताना ओमराजे निंबाळकर कोर्टात होते. त्यावेळी कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक जमले होते, यावेळी ते आक्रमक भूमिका घेतानाही दिसले. निकालानंतर ओमराजे निंबाळकर थेट पुण्यात दाखल झाले. ते आपल्या निवासस्थानी आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे नुकताच ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीकरिता गेले आहेत.

हेच नाही तर पुण्यातील ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमत आहेत. पोलिसांनी आता त्याच पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त वाढवला. पोलीस पथकांच्या 5 गाड्या निवासस्थानाच्या बाहेर तैनात करण्यात आल्यात.

बंडखोरी केलेल्या 5 खासदार अज्ञातस्थळी आहेत. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये यांना ठेवण्यात आल्याचे कळतंय. फक्त ओमराजे निंबाळकर बंडखोरी करूनही राज्यात आहे. शिवसैनिकांनी ऑपरेश या बंडखोरी खासदारांविरोधात सुरू केले. त्याच आता ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर शिवसैनिक ठाकरे गटाचे जमत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिवच्या निवासस्थानीही पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिस अलर्ट मोडवर आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल