नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाला मान्यता, किती खाटा वाढणार?

| Updated on: Feb 10, 2021 | 9:03 PM

ठाकरे सरकारने नाशिककरांसाठी आनंदाची बातमी दिलीय. आज झालेल्या निर्णयानुसार सरकारने नाशिकमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिलीय.

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाला मान्यता, किती खाटा वाढणार?
CM Uddhav Thackeray
Follow us on

नाशिक : ठाकरे सरकारने नाशिककरांसाठी आनंदाची बातमी दिलीय. आज झालेल्या निर्णयानुसार सरकारने नाशिकमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिलीय. सोबतच त्याला संलग्न 430 खाटांचं रुग्णालय सुरु करण्यासही परवानगी दिलीय. आज (10 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे (Thackeray Government permit Medical College and attached Hospital in Nashik).

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला (नाशिक) संलग्न असलेल्या या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सुविधांचा विचार करुन पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास मान्यता मिळालीय. तसेच त्यामध्ये 15 विषयांमध्ये एकूण 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यात येणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न रुग्णालय स्वायत्त असणार आहे. या महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आलीय.

महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे 627 कोटी 62 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतूदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ, वैद्यकीय शिक्षणाबाबत आणि आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेऊन नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा विचार करता नाशिक जिल्ह्यात देखील अतिविशेषोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

नाशिक येथे 1999 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या विद्यापीठास राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे महाविद्यालय संलग्नित आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत अध्यापन व संशोधन तसेच अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असंही हा निर्णय घेताना सांगण्यात आलंय.

हेही वाचा :

मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर फोडू नका, मुख्यमंत्र्यांनी दिलेली तंबीही मंत्र्यांनी ‘फोडली’

मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि उपमुख्यमंत्रिपदी कोण? दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठरली

दिल्लीत पुन्हा एकदा मोदी Vs केजरीवाल? उपराज्यपालांचे अधिकार वाढणार; केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

व्हिडीओ पाहा :

Thackeray Government permit Medical College and attached Hospital in Nashik