खोटं बोलणं पाप आहे, मुनी असाल तर…, ठाकरे गटाचा थेट इशारा, जैन मुनींच्या व्हिडीओने महाराष्ट्राचे राजकारण तापलं
आज महाराष्ट्रात 'मराठी विरुद्ध मारवाडी' असा नवा वाद सुरू झाला आहे. एका जैन मुनींच्या व्हायरल व्हिडिओमुळे हा संघर्ष पेटला असून, त्यांनी लालबाग परिसरात उद्धव ठाकरेंच्या प्रभावावर टीका केली होती. यावर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

आज आपल्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लीम, बांग्लादेशींसोबतचा वाद दुसरीकडेच राहिला आहे. पण आता मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरु झाला आहे. संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरेंचं राज्य आहे, अशी टीका एका जैन मुनींनी केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या मुनींच्या विधानांवर तीव्र टीका केली आहे. तसेच भाजप मुंबईचे शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अखिल चित्रे यांनी नुकंतच त्यांच्या ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका जैन मुनींच्या भाषणाचा आहे. या भाषणात जैन मुनी हे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहे. आता यावर अखिल चित्रे यांनी ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत. आमचं स्वप्न मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी, हेच आहे. पण भाजपाला ते नको. मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय, हिंदीभाषिक असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता त्यांनी दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा नवा डाव टाकला आहे, असा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.
अखिल चित्रे काय म्हणाले?
पहिलं,महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं.मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, “शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात” हा आरोप सरळसरळ खोटा आहे. आमचे खासदार,आमदार,नगरसेवक प्रत्येक मुंबईकराची सेवा करतात, धर्म-जात न पाहता. आणि हो, विलेपार्ल्यातला जैनालय नेमका कुणामुळे वाचला?तो तोडला जात होता तेव्हा कुणाचं सरकार होतं, याचाही जरा मागोवा घ्या.
आमचं स्वप्न मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी, हेच आहे.पण भाजपाला ते नको.मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय, हिंदीभाषिक असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता त्यांनी दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा नवा डाव टाकला आहे. यासाठीच एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू आहे.
हिंसाचाराला चिथावणी देणं हे जैन तत्त्वज्ञानात मुळीच बसत नाही.हिंदू-मुस्लिम तणाव वाढवणारी भाषा आणि लालबाग मध्ये ‘हिंदू–बांगलादेश’ असा विषय उकरून काढण्याचा हेतू स्पष्ट आहे. इतकीच देशसेवा असेल तर सीमासुरक्षेबाबत अमित शहांनाच विचारणा करा. माझी जैन बांधवांना विनंती आपण मुंबईत शांततेनं राहतो. जर कुणी जैन धर्माचा वापर करून वाद पेटवीत असेल तर वेळीच थांबवा. भाजपाचं सूत्र स्पष्ट ‘use and throw’. आज वापरतील, उद्या वादाच्या तोंडाशी तुम्हालाच सोडून देतील.म्हणून या चिथावणीखोर ‘जैन मुनी’मागचा खरा बोलविता धनी कोण, हे ओळखा आणि मुंबईची शांतता बिघडवू पाहणाऱ्या घटकांना रोखा. जय महाराष्ट्र!, अशी टीका अखिल चित्रे यांनी केली आहे.
पहिलं,महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं.मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा.दुसरं, “शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात” हा आरोप सरळसरळ खोटा आहे.आमचे… pic.twitter.com/pWFjuSL7sP
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 6, 2025
दरम्यान या प्रकरणामुळे मराठी अस्मिता आणि अमराठी व्यापारी समाज यांच्यातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने या नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
