AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांना कुणी धमकी दिली? कोणत्या मंत्र्याच्या पत्रकार परिषदेनंतर राऊत यांना धमकीचे फोन येताय ?

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावरुन विरोधी पक्षांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. त्यातच संजय राऊत हे दररोज कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून कर्नाटक सरकारसह भाजपवर निशाणा साधत आहे.

संजय राऊत यांना कुणी धमकी दिली? कोणत्या मंत्र्याच्या पत्रकार परिषदेनंतर राऊत यांना धमकीचे फोन येताय ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 08, 2022 | 10:49 AM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना धमकीचे दोन फोन आल्याचे संजय राऊत यांनी स्वतःच पत्रकारांना ही माहिती दिली आहे. ही धमकी कन्नड रक्षण वेदिकेकडून आल्याचा त्यांनी दावा केला असला तरी ही धमकी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर आल्याचा दावा करण्यात आला आहे. शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा बंड कराव्या लागतील, संजय राऊत यांना आवरा अशा स्वरूपाची विनंती वजा इशारा देण्यात आला होता. त्याच नंतर माझ्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. माझ्यावर हल्ला झाला तर तो हल्ला माझ्यावर नसून महाराष्ट्रावर हल्ला असेल असे इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिकच तापला असून थेट धमक्यांपर्यन्त हा विषय जाऊन ठेपल्याने वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावरुन विरोधी पक्षांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. त्यातच संजय राऊत हे दररोज कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून कर्नाटक सरकारसह भाजपवर निशाणा साधत आहे.

महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकमध्ये जाणार होते, मात्र ते का गेले नाहीत असा सवाल उपस्थित करत षण्ड आहात का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता.

संजय राऊत यांनी बेळगाव सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तुमच्यावर रोज थुंकतोय, दररोज कानशिलात लगावतोय असं म्हणत भाजप आणि शिंदे गटाला टोले लगावले होते.

त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शंभूराज देसाई यांच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यातच राऊत यांच्या पत्रकार परिषदा बंद कराव्या लागतील असं देसाई यांनी म्हंटलं होतं.

त्यानंतर मला धमक्यांचे दोन फोन आल्याचे राऊत यांनी सांगितले आहे, कन्नड रक्षण वेदिकेने हे फोन केल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. मात्र त्याच वेळी माझ्यावर हल्ला झाला तर तो माझ्यावरील हल्ला नसूनन महाराष्ट्रावरील हल्ला असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी