AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा खासदारांवर तत्काळ कारवाई नाहीच? किती दिवसांचा अल्टिमेटम? अरविंद सावंतांनी दिली मोठी अपडेट

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी व्हीप न पाळल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. खासदार अरविंद सावंत यांच्या माहितीनुसार, तात्काळ कारवाई होणार नसून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल व त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. याबाबत लोकसभा अध्यक्षांनाही कळवले जाणार आहे, ज्यामुळे या खासदारांच्या अपात्रतेची शक्यता वर्तवली जात आहे.

सहा खासदारांवर तत्काळ कारवाई नाहीच? किती दिवसांचा अल्टिमेटम? अरविंद सावंतांनी दिली मोठी अपडेट
सहा खासदारांवर कारवाई कधी ? अरविंद सावंतांनी दिली मोठी अपडेट
| Updated on: Jun 18, 2026 | 2:54 PM
Share

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार फुटले आहेत. पक्षाने बोलवलेल्या संसदीय समितीच्या बैठकीला हे खासदार आले नाहीत. व्हीप बजावूनही हे खासदार आले नाहीत. त्यामुळे या खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता या सहा खासदारांवर ठाकरे गट कारवाई करण्यासाठी काय पावलं उचलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या खासदारांवर तात्काळ कोणतीही कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आठ दिवसानंतरच या खासदारांवर कारवाई होईल, असं चित्र सध्या आहे.

पक्षाच्या संसदीय दलाची बैठक झाल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदारांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. बैठकीला उपस्थित न राहणं हा पक्षद्रोह आहे. या सर्व खासदारांना व्हीप बजावला होता, पण ते बैठकीला आले नाहीत. या सर्व खासदारांना आज संध्याकाळपर्यंत कारणे दाखवा नोटीस पाठवू. सात दिवसाच्या आत त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे, असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.

लोकसभा अध्यक्षांना कळवणार

या खासदारांनी पार्टीचा व्हीप पाळला नाही. पार्टीच्या बैठकीला आले नाही, याची माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली जाणार आहे, अशी माहितीही अरविंद सावंत यांनी दिली. तसेच या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याची चर्चा आहे. अधिकृतपणे काहीच समोर आलं नाही. आम्ही व्हीप बजावला, आम्ही पत्रक काढलं, ते सर्व तुम्हाला दाखवलं. जर या सहा जणांनी वेगळा गट स्थापन केला असेल तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र दाखवावं. चोरी करणारे चोरी का दाखवत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शरद यादवांची खासदारकी गेली होती

या खासदारांवर काय कारवाई करायची याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहोत. गैरहजर राहिल्यानंतर त्यावर काय कायदेशीर कारवाई करायची आहे, ती करण्यात येईल. मला अधिकार आहे. मी व्हीप बजावला, असं सांगतानाच राज्यसभेत शरद यादव सदस्य होते. त्यांच्या पक्षाला सोडून ते थेट गेले नव्हते. पण विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी भाषण केलं होतं. त्यांच्या पक्षाने अध्यक्षांना पत्र दिलं आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी लगेच त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा