राज्यात मोठा उलटफेर होणार? शरद पवार गटातील 2-4 जण मंत्रि‍पदासाठी….; ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

राज्यात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील दोन-चार लोक मंत्रिपदासाठी हपापले आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

राज्यात मोठा उलटफेर होणार? शरद पवार गटातील 2-4 जण मंत्रि‍पदासाठी....; ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 9:51 AM

सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील प्रफुल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी बैठकांचा धडका सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यात सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नवी  दिल्लीतील संसद परिसरात 35 मिनिटे चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार का, यावरून चर्चा सुरू झाली आहे. याचदम्यान, शरद पवार गटातील 2-4 लोक हे मंत्रिपदासाठी हपापले असू शकतात, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाच्या ‘सामना’ मुखपत्रातून राज्याच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. या अग्रलेखातून दावा करण्यात आला आहे की, ‘ दोन्ही राष्ट्रवादीत सध्या नाटय प्रयोग सुरू झालाय. त्याचबरोबर मैदानी खेळही चाललाय. नाट्य प्रयोग म्हणावा तसा रंगताना दिसत नाहीये. त्यामुळे खेळ म्हणावा तर खेळाचे नियम, स्वरूप वगैरेंबाबत संभ्रम आहे. आता हा कबड्डीप्रमाणे खेळ वाटू लागलाय.  एकमेकांचे पाय खेचणे. कधी हा आबाधुबीचा, तर कधी लपाछपीचा खेळ वाटतोय. परंतु या नाटक व खेळ यांचे मिश्रण असलेल्या या खेळामुळे मराठी माणसांचे चांगलेच मनोरंजन होतंय. एका बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वगैरे खेळाडू आहेत. त्यांनी विलीनीकरण असा नवा खेळ उघडलाय’.

Loading...

‘तटकरेंची पलटी…’

ठाकरे गटाने अग्रलेखातून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधल्याचेही दिसून आले. अजित पवार हयात असताना विलीनीकरण खेळातील चर्चा, बैठका सुरू होत्या.  अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या 27 बैठका झाल्याचा दावा करण्यात आलाय. परंतु या निकालाआधीच अजित पवार यांच्या निधनाने या नाटकावर पडदा पडला. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलीनीकरणावर कधीच चर्चा झाली नाही, असं सांगणारे तटकरे पलटी मारून सांगताहेत. अजित पवार असते तर विलीनीकरण घडले असते. अजित पवार विलीनीकरणासाठी प्रयत्नशील होते, हे तटकरेंचं भाष्य बनचुकेपणाचे आहे’.

‘शरद पवार गटातील नेते मंत्रिपदासाठी हपापले’

‘शरद पवार गटात मंत्रिपदासाठी हपापलेले दोन-चार लोक असू शकतात. परंतु शरद पवार यांनी त्यांच्या जीवनात इतकी वर्षे पाळलेले सत्व नष्ट करावे हे बरे नव्हे. या खेळात कोण कोणात विलीन होणार हा पुढचा प्रश्न आहे. भाजपच्या पायाशी बुटचाटेगिरी करणाऱ्या गटाशी शरद पवारांनी चर्चा करत बसावे व महाराष्ट्रात संभ्रम, संशयाचे वातावरण निर्माण व्हावे, ही बाब महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही. शरद पवार , सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्या सारख्या पुढाऱ्यांनी खेळात वाहत जाऊ नये. ओंडकेही असेच वाहत जातात, तसेच विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हास्यास्पद ठरतोय, अशी टीका करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us