धर्मवीर आनंद दीघे यांची ही एक संस्था ठाणे महापालिकेकडून सील

व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे शिवसैनिक असल्याने शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

धर्मवीर आनंद दीघे यांची ही एक संस्था ठाणे महापालिकेकडून सील
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:12 PM

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे(Anand Dighe) यांनी 25 वर्षांपूर्वी ठाण्यातील तरुणांसाठी सावरकर नगर येथे व्यायाम शाळा सुरु केली होती. परंतु या व्यायाम शाळेला आता ठाणे महापालिकेने(Thane Municipal Corporation ) टाळे ठेकले आहे. या व्यायामशाळेचे सात महिन्यांचे भाडे थकल्यामुळे तसेच अनधिकृत बांधकाम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. मात्र, ही व्यायामशाळा चालवणारे शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे शिवसैनिक असल्याने शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ठाण्याच्या सावरकर नगर या भागात 25 वर्षांपूर्वी एक हजार चौरस फुटांच्या जागेत आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या उपस्थितीत ही व्यायामशाळा सुरू झाली. या व्यायामशाळेची देखभाल शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेच्या वतीने केली जाते.

कोरोना संकटाच्या काळात दोन वर्षे ही व्यायामशळा बंद होती. यामुळे सात महिन्यांचे सुमारे 65 हजार रुपये भाडे थकले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली.

त्यानंतर सहकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत थकीत भाड्यापैकी 15 हजार रुपये भरले आणि उर्वरित रकमेसाठी 15 दिवसांची मुदत मागून घेतली होती.

या घटनेला चार दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी दुपारी महापालिकेचे 30 कर्मचाऱ्यांचे पथक सावरकर नगरमध्ये दाखल झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यायामशाळा थेट सील करण्यात आली.

ठाकरे समर्थक म्हणून कारवाई केली असल्याचा आरोप देखील यावेळी शिरोडकर यांनी केला आहे. मात्र उशिरा का होईना व्यायाम शाळेचे थकीत भाडे आता सध्या संपूर्ण भरले असल्याचे देखील संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर यांनी सांगितले आहे .

ठाणे महानगरपालिकेने मागील आठवडा भरापासून अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकी असलेल्या महापालिकेच्या वास्तूंना टाळे ठोकण्यात येत आहे.

ठाण्यातील सावरकर नगर येथील आमदार खासदार निधीतून बांधण्यात आलेली व्यायाम शाळेवरही कारवाई करण्यात आली आहे. ही व्यायामशाळा सावरकर नगर रहिवासी संघ यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आली होती.

या वास्तूचे मुदत संपल्यामुळे व भाडे शिल्लक असल्यामुळे महापालिकेने ही व्यायामशाळा ताब्यात घेतली आहे. तर, पालिकेने दिलेल्या या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. असे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी महेश आहेर यांनी यांगीतले. तसेच आमच्यावर कोणतेही राजकीय दबाव नसल्याचे देखील ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.