आम्ही शूद्र आहोत याची जाणीव तुम्ही करून देत आहात… जितेंद्र आव्हाड आक्रमक; केली मोठी मागणी

संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळेला मोठी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

आम्ही शूद्र आहोत याची जाणीव तुम्ही करून देत आहात... जितेंद्र आव्हाड आक्रमक; केली मोठी मागणी
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 3:02 PM

ठाणे : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी रामनवमीच्या निमित्ताने एक पोस्ट केली होती. ही पोस्ट लिहीत असतांना संयोगीताराजे छत्रपती यांनी 10 फेब्रुवारीला घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख त्यामध्ये केल्यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र म्हणण्यावरून झालेल्या वादावर संयोगीताराजे यांनी काळाराम मंदिरातील पुजाऱ्यावर आरोप केले होते. त्यावरून महंत सुधारीदास पुजारी यांनी पत्रकार परिषद घेत असं घडलंच नाही मात्र अवमान झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हंटलं होतं. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहे. ते नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत आहे.

संयोगीताराजे यांच्या पोस्टवरुन ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सोशल मिडियावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत सनातनी वृत्ती अद्यापही असल्याचे म्हणत त्याच्यावर आम्ही बोलणारच म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे.

वेदोक्त आणि पुराणोक्त हे बंद करा म्हणत असे भेदभाव केलेल चालणार नाही. आणि त्यावर बोलाल तर आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही. संबंधित पुजारी यांनी छत्रपती घराण्याचे अपमान केला आहे त्यामुळे इतरांचे काय असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

संविधानाने जसं सर्वांना समान केलं आहे तसं धर्मानेही सर्वांना समान करावं. आपलं मतं प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन मांडावे यासाठी मी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे. काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहे.

मी संकल्प सोडतो त्यावेळेला पुराणोक्त म्हंटलं जातं. हे असं वेगवेगलं नसलं पाहिजे. सर्वांना समान केलं पाहिजे अशी मागणी करण्यासाठी मी नाशिकला चाललो असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगत यातून वर्णभेद निर्माण केला जात असल्याचे म्हंटले आहे.

काळाराम मंदिर आम्हाला जाणीव करून देत आहेत की आम्ही शूद्र आहोत. आम्ही शूद्र आहोत याची मला अजिबात लाज वाटत नाही. याच्यापढे सगळ्यांनाच वेदोक्त लागू होईल असे जाहीर करून टाका असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे.

कालच्या दिवशीही जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवर काळाराम मंदिरात संयोगीताराजे यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी सनातनी धर्मावरुन गंभीर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी दुपारनंतर नाशिकदौरा जाहीर केला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड नाशिक दौऱ्यावर येत आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.