AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता… प्रवासी गाढ झोपेत, धडाम धडाम आवाज अन्… अपघात नेमका कसा झाला?

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटे 4 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात 13 प्रवासी ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच या अपघातातील जखमींवर खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता... प्रवासी गाढ झोपेत, धडाम धडाम आवाज अन्... अपघात नेमका कसा झाला?
accident Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 9:39 AM
Share

खोपोली : लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 लोक जखमी झाले आहेत. आज पहाटे चारच्या सुमारास प्रवाशी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बस कोसळल्याने धडाम धडाम आवाज येताच काही प्रवासी भानावर आले. त्यांनी लगेच किंचाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता. या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस साईड बॅरियर तोडून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. त्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. ही बस पुण्यावरून मुंबईला निघाली होती. पहाटे 4ची वेळ होती. सर्वच प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक धडाम धडाम धडाम असा आवाज झाला.

काही तरी आक्रीत घडल्याची जाणीव होण्याआधीच बस दरीत कोसळली. त्यामुळे कुणाचं डोकं, कुणाचं शरीर तर कुणाचे पाय बसवर आदळले. अनेकांना मुक्का मार लागला. काळोखात काहीच दिसत नव्हतं. जे जिवंत होते त्यांना आपण कुठे आहोत हेही कळत नव्हतं. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला. वाचवा वाचवा… कुणी आहे का? असा पुकारा सुरू झाला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली.

वाहतुकीची कोंडी

स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला आहे. क्रेन मागवून बस बाजूला केली जात आहे. रुग्णवाहिकेतून जखमींना खोपोली नगर पालिकेच्या दवाखान्यात दाखल केलं जात आहे. तसेच अपघातामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

16 प्रवासी जखमी

सध्या बसमधील 16 जखमी प्रवाश्यांना बाहेर काढलं आहे. अजूनही काही लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसेच जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच खासगी डॉक्टरांनाही खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात पाचारण करण्यात आलं आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Follow Us
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंत
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर विशेष पथक स्थापन, आता...
तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग