आम्ही लग्नाळू… 22-2-22 तारखेचा अनोखा मेळ साधून 45 जोडपी होणार विवाहबद्ध; ठाण्याच्या उपनिबंधक कार्यालयात लगीनघाई

पिढी बदलतेय तसतशा प्रत्येक पिढीच्या संकल्पनाही बदलत आहेत. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कसा करता येईल यावर हल्लीची पिढी भरपूर भर देत आहे. त्यात जर लग्नाची (marriage ceremony) गोष्ट असेल तर इव्हेंटला तोडच नसते.

आम्ही लग्नाळू... 22-2-22 तारखेचा अनोखा मेळ साधून 45 जोडपी होणार विवाहबद्ध; ठाण्याच्या उपनिबंधक कार्यालयात लगीनघाई
आम्ही लग्नाळू... 22-2-22 तारखेचा अनोखा मेळ साधून 45 जोडपी होणार विवाहबद्ध
| Updated on: Feb 22, 2022 | 11:17 AM

ठाणे: पिढी बदलतेय तसतशा प्रत्येक पिढीच्या संकल्पनाही बदलत आहेत. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कसा करता येईल यावर हल्लीची पिढी भरपूर भर देत आहे. त्यात जर लग्नाची (marriage ceremony) गोष्ट असेल तर इव्हेंटला तोडच नसते. अगदी लग्नाच्या मुहूर्तापासून ते लग्नाच्या डेकोरेशनपर्यंत सर्वच गोष्टींवर भर असतो. हल्ली तर लग्नाच्या रेशीमगाठी तारखा पाहून ठरवल्या जात आहेत. आज 22-2-22 ही तारीख आहे. आजच्या तारखेतच दोन आकड्यांचा खेळ असल्याने लग्नाळूंनीही हा आकड्यांचा मुहूर्त साधत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील (thane) उपनिबंधक कार्यालयात आज 45 जोडप्यांचा विवाह (marriage) पार पडणार आहे. त्यासाठी संपूर्ण उपनिबंधक कार्यालय सज्ज झालं आहे. या कार्यालयाला केळीच्या खांबाचे गेट लावण्यात आले आहेत. फुलांचे तोरण बांधण्यात आले असून सनईचे सूर झडताना दिसत आहेत.

22-2-22 ही तारीख म्हणजे लग्नाचा पारंपारिक मुहूर्त नाहीये. पण अशी तारीख क्वचितच येते आणि लक्षातही राहते. त्यामुळे विवाहोच्छूक अशा तारखांना लग्न करण्यावर अधिक भर देत असतात. त्यासाठी वधू-वरांनी गेल्या पंधरा दिवसांपासूनच तयारी केली होती. ठाण्याच्या विवाह कार्यालयात याच तारखेचं लग्नाची नोंदणीही केली आहे. तसेच नातेवाईक आणि मोजक्याच मित्रमंडळींना या लग्नसोहळ्याला येण्याचं आवतनही दिलं आहे. तसेच रिसेप्शनसाठी हॉटेल, छोटे हॉलही बुक केले आहेत.

अशा साधला तारख्या

विवाहोच्छुकांनी या पूर्वीही तारखांचा मेळ साधत विवाह सोहळे उरकून घेतले आहेत. ठाण्याच्या निबंधक कार्यालयात 11-11-11 या दिवशी 27 जण लग्नाच्या बेडीत अडकले. तर 12-12-12 रोजी 30 जणांनी शुभमंगल उरकून टाकले होते. तर व्हॅलेंटाईनच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी 40 जणांनी लग्न केलं होतं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करणाऱ्यांची संख्या अधिक असते असंही उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आलं.

 

संबंधित बातम्या:

हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण! पण कोण कुत्रा अन् कोण मांजर हे पहायला पाहिजे, शिवसेना-भाजप वादावर काय म्हणाले आठवले?

VIDEO | ‘पुष्पा’चा नाशिकमध्ये धुमाकूळ; शेतकऱ्यांना 60 लाखांचे लावले चंदन, प्रकरण काय?

Maharashtra News Live Update : मुक्ताईनगरात सेनेच्या पाठोपाठ खडसेंना काँग्रेसचा धक्का