Kalyan Murder : कल्याणमध्ये मित्रांनीच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला 24 तासात बेड्या

थापा आणि धामी हे एकमेकांचे मित्र होते. या दोघांनाही रहायला घर नसल्याने दोघांनी एका पडीक इमारतीचा आसरा घेतला होता. थापा हा चायनीज गाडीवर कूक होता तर धामी हा बिगारी काम करायचा. थापा हा कायम या ठिकाणी महिलांना घेवून येत होता. ही बाब धामीला पसंत नव्हती.

Kalyan Murder : कल्याणमध्ये मित्रांनीच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला 24 तासात बेड्या
कल्याणमध्ये मित्रांनीच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 04, 2022 | 8:35 PM

कल्याण : महिला आणण्यावरुन झालेल्या वादातून मित्रानेच मित्रा (Friend)ची दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेला घडली आहे. थापा असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर शेरबहादूर धामी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित आणि आरोपी दोघेही मूळचे नेपाळचे असून कामानिमित्त कल्याणमध्ये राहतात. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस (Mahatma Phule Police) चौकीत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासात महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

थापा महिला आणायचा याच रागातून हत्या

थापा आणि धामी हे एकमेकांचे मित्र होते. या दोघांनाही रहायला घर नसल्याने दोघांनी एका पडीक इमारतीचा आसरा घेतला होता. थापा हा चायनीज गाडीवर कूक होता तर धामी हा बिगारी काम करायचा. थापा हा कायम या ठिकाणी महिलांना घेवून येत होता. ही बाब धामीला पसंत नव्हती. महिलांना आणू नको असे सांगत धामीने त्याला विरोध केला. मात्र थापा ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून धामी याने थापा याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर धामी तेथून पळून गेला.

अवघ्या 24 तासात आरोपी गजाआड

कल्याण पश्चिमेला एका पडीक इमारतीत हत्या झाल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांनी देण्यात आली. हत्येची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने वेगाने तपास सुरू केला. ही हत्या थापाच्या मित्राने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार कसून शोध घेत अवघ्या 24 तासात आरोपीला गजाआड करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सांगितलं. (A friend was stoned to death for a minor reason in Kalyan, the accused was handcuffed within 24 hours)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें