Ambernath Suicide : अंबरनाथमध्ये बेपत्ता इसमाची आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला

डफळे हे 4 मे रोजी नेहमीप्रमाणे वसईला आपल्या कामावर गेले होते. मात्र ते घरी परतलेच नाही. कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. चार दिवसापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. लोकनगरी बायपास रस्त्यालगतच्या झुडपात एक कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह स्थानिकांना आढळून आला.

Ambernath Suicide : अंबरनाथमध्ये बेपत्ता इसमाची आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला
अंबरनाथमध्ये बेपत्ता इसमाची आत्महत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 11:42 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका 59 वर्षीय इसमा (Man)ने झाडाला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यालगत ही घटना घडली आहे. हैबत रामचंद्र डफळे असं आत्महत्या केलेल्या इसमाचं नाव आहे. सदर इसम आयटीआय कॉलनी परिसरात वास्तव्याला होते. डफळे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता (Missing) होते. वसईच्या एका कंपनीत डफळे हे काम करत होते. मागील बुधवारी 4 मे रोजी ते कामावर गेले होते. मात्र तेव्हापासून ते घरी परतलेच नव्हते. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांनी वसईच्या पोलीस ठाण्यात ते हरवले असल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

झुडुपात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

डफळे हे 4 मे रोजी नेहमीप्रमाणे वसईला आपल्या कामावर गेले होते. मात्र ते घरी परतलेच नाही. कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. चार दिवसापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. लोकनगरी बायपास रस्त्यालगतच्या झुडपात एक कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह स्थानिकांना आढळून आला. या मृतदेहाशेजारी एक बॅग आढळून आली. या बॅगेत आढळलेल्या ओळखपत्रांवरून हा मृतदेह बेपत्ता असलेल्या हैबत रामचंद्र डफळे यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. डफळे यांनी इथल्या एका झाडाला गळफास घेतला होता. मात्र त्यांचा मृतदेह कुजल्यानं तो झाडावरून खाली पडला. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डफळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हैबत डफळे यांनी आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.