आईस्क्रीम खाण्यासाठी उभे होते ग्राहक, असं काही घडलं की क्षणात होत्याचं नव्हतं झालं

कामावरून घरी परतणारे चार जण या आइस्क्रीम टेम्पोजवळ आइस्क्रीम खाण्यासाठी थांबले होते. त्यांनाही जोरदार धडक बसल्याने त्यामध्ये मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी हा चाका खाली आला.

आईस्क्रीम खाण्यासाठी उभे होते ग्राहक, असं काही घडलं की क्षणात होत्याचं नव्हतं झालं
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 7:55 PM

ठाणे : काही जण रस्त्यावर आईस्क्रिक खातात. बाजूला वाहनं सुरू असतात. अशावेळी चौकस राहून आईस्क्रिम खाल्ली पाहिजे. कारण चौकस नसल्यास बाजूने सुसाट वाहन आल्यास अपघात होण्याची भीती असते. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मोठी दुर्घटना घडली. रस्त्याच्या कडेला आइस्क्रीम टेम्पोवर आइस्क्रीम खाण्यासाठी युवक उभा होता. तो युवक भरधाव कंटेनरच्या धडकेत ठार झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी (वय 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.

कारला वाचवण्याच्या नादात टेम्पोला धडक

खडवली नाका या ठिकाणी नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरने आपल्या पुढे असलेल्या कारला ठोकले. त्यामध्ये कार रस्त्यात उजवीकडे वळली होती. कारला वाचवण्याच्या नादात कंटेनरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आइस्क्रीम टेम्पो गाडीला धडक दिली.

चार जण खात होते आईस्क्रीम

कामावरून घरी परतणारे चार जण या आइस्क्रीम टेम्पोजवळ आइस्क्रीम खाण्यासाठी थांबले होते. त्यांनाही जोरदार धडक बसल्याने त्यामध्ये मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी हा चाका खाली आला. त्याचा जागेवर मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीसीटीव्हीत घटना कैद

या अपघातात कारसह तीन दुचाकी आणि आइस्क्रीम टेम्पो या वाहनांचे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला पडघा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या अपघाताची घटना तेथील लक्की हॉटेलबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.