AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे ते डोंबिवली प्रवास २० मिनिटांत करता येणार? खासदार शिंदे यांचा दावा

माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला. मात्र आता या पुलाची उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठाणे ते डोंबिवली प्रवास २० मिनिटांत करता येणार? खासदार शिंदे यांचा दावा
| Edited By: | Updated on: Apr 02, 2023 | 8:06 AM
Share

ठाणे : ठाणे ते डोंबिवलीला जाण्यासाठी सध्या दीड तास लागतात. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ जातो. हा वेळ कसा कमी करता येईल, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यावर आता त्यावर उपाय निघालाय. हे प्रवासाचं अंतर लवकरचं कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. डोंबिवलीहून ठाण्याला रस्तामार्गे जाताना उल्हास नदी लागते. ही नदी ओलांडण्यासाठी सद्य:स्थितीत कल्याणच्या दुगार्डी किल्ल्याखेरीज कुठलाही पूल नाही. त्यामुळे वाहनचालकांना मुंबई-नाशिक महामार्गावरून राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुगार्डी ते कल्याण पूर्वेहून फिरून दीड तासांचा प्रवास करून यावे लागतो.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार प्रवास

माणकोली ब्रीज हा डोंबिवलीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या पुलामुळे हे दोन्ही शहरांत २० मिनिटांत जाता येणार आहे. या पुलाचे काम गतीने सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा पूल सुरू होणार आहे. अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

माणकोलीजवळ उभारला जातोय विशेष पूल

हा त्रास दूर करण्यासाठीच राजनोलीपासून जवळपास सहा किमी आधी माणकोलीजवळ विशेष पूल उभारला जात आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल संपणार आहे. या पूल उभारणीनंतर ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे. या पुलाचे मूळ नियोजन २०१३ मधील आहे.

९० टक्के काम पूर्ण

२०१६ मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ३६ महिन्यांत उभारणी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला. मात्र आता या पुलाची उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा ब्रिज लोकांसाठी उघडणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. हा पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास डोंबिवलीहुन ठाण्याला अवघ्या २० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.