AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Case : पुरावा नष्ट करण्याचा तर प्रयत्न तर नाही ना, विजय वडेट्टीवार यांची शंका

अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून बंदूक हिसकावून त्याने तीन राऊंड फायर केले होते. पोलीस देखील यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे.

Badlapur Case : पुरावा नष्ट करण्याचा तर प्रयत्न तर नाही ना, विजय वडेट्टीवार यांची शंका
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 23, 2024 | 7:26 PM
Share

Akshay shinde suicide : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारात त्याच शाळेत काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होता. अक्षय शिंदे असं त्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो तळोजा कारागृहात असताना त्याला बदलापूरला आणत असताना आरोपीने अधिकाऱ्यांवर देखील गोळी झाडली अशी देखील माहिती आहे. त्याने तीन गोळा फायर केल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची देखील माहिती आहे. बदलापूरातील या घटनेवर बदलापुरात बंद पाळण्यात आला होता.

बदलापूर प्रकरणात आरोपी पकडण्यात उशीर केला. संस्थेतील पदाधिकारी जे आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएस पर्यंत भाजपच्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचलेले आहे.त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे. गोळी पोलिसांनी झाडली का अशीही चर्चा आहे. पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि वास्तविकता लोकांसमोर याची अशी माझी मागणी आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?