AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलवली इमर्जन्सी बैठक, मनसेने आधीच म्हटलय ‘जे करायचंय ते करा’, काल शिवाजी पार्कात ट्रेलर दिसला, आज मुंबईत काय घडणार?

Raj Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत मागच्या आठवड्याभरापासून आंदोलन सुरु आहे. शनिवारी कॉकरोच जनता पार्टीचं जंतर-मंतरवरील आंदोलन पोलिसांनी यशस्वी होऊ दिलं नाही. आज मुंबईतही मोठं आंदोलन होऊ शकतं.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलवली इमर्जन्सी बैठक, मनसेने आधीच म्हटलय  ‘जे करायचंय ते करा’, काल शिवाजी पार्कात ट्रेलर दिसला, आज मुंबईत काय घडणार?
Raj thackeray
| Updated on: Oct 12, 2026 | 8:26 AM
Share

मयुरेश जाधव, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मनसेच्या सर्व नेत्यांना शिवतीर्थवर बैठकीसाठी बोलावलं आहे. काल झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दादर शिवाजी पार्क परिसरात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. यावेळी पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यावरुन मोठा गदारोळ झाला. दोन्ही ठाकरे बंधु आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पोलिसांची गाडी अडवली. ठाकरेंची पुढची पिढी खूपच आक्रमक झाली होती. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. अखेर आंदोलकांचं आक्रमक रुप पाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडून दिलं. आज मनसेकडून ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी सह्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांनी तातडीची बैठक मनसेच्या पुढच्या आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी बोलावलेली असू शकते. आज सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शीवतीर्थ निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात दोन आंदोलनं होणार आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी मनसे आणि सीजेपी आक्रमक झाली आहे. मनसेकडून आज स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेचं दडपशाही विरोधात मूक आंदोलन आहे. हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सामील होण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेने नागरिकांना आव्हान केलं आहे.

त्यानंतर देशातील वातावरण तापलं

मागच्या आठवड्याभरापासून दिल्लीत आंदोलनांची मालिका सुरु आहे. SIR प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बदल केले. त्यामुळे कोट्यवधी मतदार बाद झाले. त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेला असं सीजेपी, काँग्रेस, विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. निवडणूक आयोगातील दोन अन्य निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा समोर आणला. एका इंग्रजी वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर देशातील वातावरण तापलं आहे.

‘जे करायचंय ते करा’

काँग्रेस खासदार आज सर्वोच्च न्यायालयावर धडक देणार आहेत. त्याआधी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाबाहेर आंदोलनं केली होती. मुंबईत ठाकरे बंधु आक्रमक झाले आहेत. मनसेने तर सरळ, सरळ म्हटलय की, ‘जे करायचंय ते करा’. “सोमवारी सकाळी सर्व ठिकाणी सह्यांची मोहीम राबवणार आहोत. सर्व सामान्य नागरिकांनी येऊन सह्या कराव्यात पाहिला टप्पा असेल. त्यानंतर दसऱ्या पर्यंत काय काय करू हे कळेल तुम्हाला” असं नितीन सरदेसाई म्हणाले.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?