AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरच्या आंदोलनाचा मध्य रेल्वेला मोठा फटका, 30 लोकल गाड्या रद्द, एक्सप्रेस खोळंबल्या

बदलापुरातील आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. नागरिकांचं सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी आंदोलन सुरु होतं. त्यामुळे अंबरनाथ ते खोपोली दरम्यान आतापर्यंत 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बदलापूरच्या आंदोलनाचा मध्य रेल्वेला मोठा फटका, 30 लोकल गाड्या रद्द, एक्सप्रेस खोळंबल्या
बदलापूरच्या आंदोलनाचा मध्य रेल्वेला मोठा फटका
| Updated on: Aug 20, 2024 | 6:47 PM
Share

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या घटना घडून 6 दिवस झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलक आज सकाळी आठ वाजता बदलापूर रेल्वे स्थानकावर जमले. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल रेल्वे वाहतूक ठप्प केली. सकाळी आठ वाजेपासून आंदोलकांनी रेल्वे सेवा ठप्प केली. आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत होती. पण आंदोलकांनी ऐकून घेतलं नाही. जवळपास 10 तास रेल्वे वाहतूक ठप्प केली. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांच्या या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

बदलापुरातील आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. नागरिकांचं सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी आंदोलन सुरु होतं. त्यामुळे अंबरनाथ ते खोपोली दरम्यान आतापर्यंत 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते अंबरनाथदरम्यान लोकसेवा सध्या सुरळीत सुरु आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस कल्याणवरुन वळवली आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

आंदोलनाचा मोठा फटका मध्य रेल्वेला

  • मध्य रेल्वेच्या 30 लोकल ट्रेन अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
  • 11 लोकल गाड्या डायव्हर्ट (वळवण्यात) आल्या आहेत.
  • मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस, व्हाया कल्याण चालवण्यात आली.
  • आतापर्यंत 10 मेल-एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे स्थानकावरुन वळवण्यात आल्या आहेत.
  • अंबरनाथ ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.