बदलापूर न्यूज
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हा अत्याचार केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर शहर बंद ठेवण्यात आलं होतं. तसेच नागरिकांनी रेल्वेरोको करत आपला संतापही व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Badlapur : अमेरिकेतून थेट बदलापुरात येत तरुणाने बजावला मतदानाचा हक्क
Badlapur Amey Somwanshi local body Election : बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी हा तरुण अमेरिकेवरुन आला. या तरुणाने मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपण मतदानासाठी भारतात आल्याचं या तरुणाने सांगितलं.
- sanjay patil
- Updated on: Dec 2, 2025
- 6:32 pm
Badlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांबाबत मोठी अपडेट
Badlapur Case : मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या आई-वडिलांबाबतच्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी कोर्टाने राज्य सरकारला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी होता. त्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेला.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 20, 2024
- 7:47 am
बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, दीड महिने फरार असलेल्या आरोपींना अटकेनंतर दोन दिवसांत जामीन
बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे दोन्ही आरोपी गेल्या दीड महिन्यापासून फरार होते. त्यांना अटकेनंतर दोन दिवसांत जामीन मिळाला आहे.
- Reporter Sunil Jadhav
- Updated on: Oct 4, 2024
- 8:39 pm
‘माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत’, अक्षय शिंदेच्या वकिलाचा खळबळजनक दावा
आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने एन्काऊंटरशी संबंधित काही प्रश्न उस्थित केले. तसेच अक्षय शिंदे याच्या वकिलांनादेखील एका गोष्टीवरुन झापलं. या सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी धक्कादायक माहिती दिली.
- Chetan Patil
- Updated on: Oct 3, 2024
- 4:13 pm
बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे अध्यक्ष आणि सचिव दोघांना जामीन मंजूर, पण तरीही जेलमध्येच राहणार
बदलापूर अत्याचार प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणात गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला. पण तरीही त्यांची रवानगी जेलमध्येच करण्यात आली आहे.
- Chetan Patil
- Updated on: Oct 3, 2024
- 3:46 pm
मृत्यूनंतर दफनासही जागा मिळेना, ठाण्यापासून बदलापूरपर्यंत, अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्कारास अनेक स्मशानभूमीत नकार
अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर सुरुवातीला बदलापूरमध्ये अंत्यविधी केला जाईल, अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार, पोलिसांनी बदलापूर येथील स्मशानभूमी निश्चित केली होती. पण स्थानिकांनी त्यास विरोध केला. यानंतर अनेक स्मशाभूमीत त्याच्या अंत्यसंस्कारास विरोध करण्यात आला.
- Chetan Patil
- Updated on: Sep 29, 2024
- 5:36 pm
अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना आणि वकिलांना संरक्षण मिळावं; कुणी केली मागणी?
Amit Katarnavre on Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या दफनविधीबाबत नेमकं काय अपडेट्स? या प्रकरणात नक्की काय घडतंय? कुणी केली संरक्षणाची मागणी? अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी यावर भाष्य केलं आहे. अक्षय शिंदे प्रकरणात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
- आयेशा सय्यद
- Updated on: Sep 26, 2024
- 2:59 pm
Tv9 स्पेशल रिपोर्ट : ‘जनता दुसरं एन्काऊंटर करेल’, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरुन राजकारण तापलं
बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन विरोधकांनी शंका उपस्थित केलीय. ज्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार झाले तिथल्या फरार संस्थाचालकांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर झाल्याचं विरोधकांनी म्हटलंय. दुसरीकडे संजय राऊतांनी, मुख्यमंत्री शिंदेंवरच निशाणा साधला. एका शिंदेंचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल, असं राऊत म्हणाले आहेत.
- Chetan Patil
- Updated on: Sep 24, 2024
- 10:49 pm
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, अक्षयचा मृत्यू…
Nilam Gorhe on Akshay Shinde Encounter : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर......
- आयेशा सय्यद
- Updated on: Sep 24, 2024
- 12:07 pm
Badlapur Case: रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर…, अक्षय शिंदे सोबत शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं काय घडलं?
Badlapur Case: मुंब्रा बायपासजवळून जात असलेली पोलिसांची गाडी... अक्षयने रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर..., पोलीस जखमी आणि अक्षयचा याचा एन्काऊंटर... शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं झालं तरी काय ? सर्वत्र बदलापूर घटनेची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Sep 24, 2024
- 8:29 am
बदलापूर अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या अडचणी वाढल्या, पोलीस कोठडीत…
Badlapur School Case Update : बदलापूरमधील चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. या प्रकरणात काय घडतंय? वाचा सविस्तर...
- आयेशा सय्यद
- Updated on: Sep 4, 2024
- 11:17 am
आंदोलकांवर कारवाई पण संस्थाचालक मोकाट!; बदलापूर अत्याचार प्रकरणात काय घडतंय?
Badlapur School Case Update : बदलापूरमधील बाल अत्याचाराच्या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शाळेतच्या संस्था चालकांबाबत कुचराई झाल्याचं दिसतंय. सहा दिवसांनंतरही अटक झालेली नाही. या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर...
- आयेशा सय्यद
- Updated on: Sep 3, 2024
- 11:44 am