पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा

| Updated on: Apr 10, 2022 | 12:30 AM

स्मारकाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. जागेचा प्रश्न, जागेवरील आरक्षणाचा मुद्दा अशा समस्यांवर मात करण्यासाठी खासदार शिंदे यांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. विषयाचे गांभीर्य ओळखून खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठकी घेतली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याण पूर्वेतील प्रभाग समिती ड कार्यालयाच्या आवारात भव्य स्मारक (Memorial) उभारले जात आहे. त्याचा भूमीपूजन सोहळा मंगळवारी, 12 एप्रिल रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे. खासदार शिंदे यांच्या प्रयत्नाने स्मारकासाठी आवश्यक जागेचे खूप कमी वेळेत आरक्षण बदलण्यात आले होते. तर नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधीही दिला आहे. शनिवारी खासदार शिंदे यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी केली. यावेळी डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी उमेश माने पाटील रिपाई नेते अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, विशाल पावशे, प्रशांत काळे आदी उपस्थित होते. (Bhumi Pujan ceremony of Dr. Babasaheb Ambedkars memorial will be held at the hands of Guardian Minister Eknath Shinde)

श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना मांडली

स्मारकाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. जागेचा प्रश्न, जागेवरील आरक्षणाचा मुद्दा अशा समस्यांवर मात करण्यासाठी खासदार शिंदे यांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. विषयाचे गांभीर्य ओळखून खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठकी घेतली. पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रसिद्ध रचनाकार अरूणकुमार यांना पाचारण करत खासदार डॉ. शिंदे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. कल्याण पूर्वेतील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी होती. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना मांडली. स्थानिकांनाही ही संकल्पना आवडली. त्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू झाली.

स्मारकासाठीचा निधी 8 कोटी 74 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आला

कल्याण पूर्वेतील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या जागेचे आरक्षण कार्यालयासाठी होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यात सातत्यपूर्ण पाठपुरवठा केल्याने अखेर 3 नोव्हेंबर 2021 रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला नगर विकास विभागाने मौजे तिसगाव येथील ड प्रभाग कार्यालयात शेजारील एकूण 8100 चौरस मीटर जागेपैकी 1300 चौरस मीटर जागेचे आरक्षण बदलण्याचा शासन निर्णय जाहीर केला. आरक्षण बदलाची ही प्रक्रिया विक्रमी वेळेत पार पडली. यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री शिंदे यांनी यात जातीने लक्ष दिले. पुढे या स्मारकासाठीचा निधी 8 कोटी 74 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आला. खासदार शिंदे यांनी स्मारकाप्रती दाखवलेली आस्था आणि सातत्य यामुळे स्मारकाचा प्रश्न विक्रमी वेळेत मार्गी लागला. (Bhumi Pujan ceremony of Dr. Babasaheb Ambedkars memorial will be held at the hands of Guardian Minister Eknath Shinde)

इतर बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शने

Megablock : प्रवाश्यांनो लक्ष असू द्या! मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक