Sharad Pawar : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या.

Sharad Pawar : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शने
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शनेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 7:37 PM

ठाणे : शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjape) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने केली. दरम्यान, महाराष्ट्राची माती जगायला आणि जगवायला शिकवते; त्यामुळे अराजक माजवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची माती हे अराजक सहन करणार नाही; पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा पवारसाहेब यांना इजा करण्याचा प्रयत्न होता. पवार साहेबांना शारीरिक इजा करून महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा कट रचण्यात आला होता, असा संशय डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. (Silent protests of NCP in Thane over attack on Sharad Pawars house)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या.

व्यक्तीगत स्वार्थासाठीच ही विषपेरणी सुरुंय

पवारांचा द्वेष हा व्यक्तीगत स्वार्थासाठीच ही विषपेरणी सुरु आहे. या घटनेनंतर भाजप नेत्याने शरद पवारांवर टीका करताना फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला दिला आहे. पण, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की सोळावा लुईस आणि मॅरी अँटोनी यांच्यासह 50 हजार जणांची गिलोटीनखाली मुंडकी छाटण्यात आले होते. या लोकांना महाराष्ट्रातही हेच करायचे आहे का? ज्या प्रकाराने अमरावतीमधील एक नेता बोलला आहे. महाराष्ट्रामध्ये अराजक माजवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. पवारांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत, असे म्हणणार्‍यांनी याचा विचार करावा की पवारांच्या नखाएवढीही आपणाला सर नाही. या महाराष्ट्राचे राजकारण पवारांभोवतीच फिरत असते, हे टीका करणार्‍याने ध्यानात घ्यायला हवा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या कृत्यामागे अराजकतेचेच डोके

महाराष्ट्र हा लोकशाही मानणारा प्रदेश आहे. पवारांवर प्रेम करणार्‍या चार पिढ्या आहेत. आज जे काही चालू आहे. ते भितीपोटीच आहे. 82 वर्षांच्या वृद्धाला घाबरलेले हे लोक शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर शारीरिक हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपली शंका आहे की, अमरावतीमधून केलेले विधान पाहता शरद पवार यांना शारीरिक इजा पोहचविण्याचा कट होता. नशिबाने दरवाजा तुटला नाही. अन्यथा घातपात झाला असता. एकूणच या कृत्यामागे अराजकतेचेच डोके होते. पवारसाहेबांना इजा करून त्याद्वारे महाराष्ट्रात अराजक माजवण्याठी शुक्रवारचा प्रकार केला असावा, असा संशयही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

शरद पवार हल्ल्यांना घाबरणारे नाहीत

पवार हे मोठ्या मनाचे माणूस आहेत. लोकांची माथी भडकावणे हा गुन्हा आहे. “सावधान शरद पवार” अशा आशयाची पोस्टर्स छापण्यात आली होती. तरीही, अशा हल्ल्यांना शरद पवार घाबरणारे नाहीत. ते पोलिसांच्या गराड्यात रहात नाहीत. अन् जर हिमंत असेल तर फ्रेंच राज्यक्रांतीसारखी कृती करुन दाखवा, आमचे हे खुले आव्हान आहे. जनताच आता कोणाचे वाईट दिवस आले आहेत, हे दाखवून देईल, असे आव्हाडांनी सांगितले.

नक्की काय घडले याचा शोध पोलिस घेतील : परांजपे

शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सुप्रियाताई सुळे यांनाही धक्काबुक्की केली. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी ही मूक निदर्शने करण्यात आली आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर जल्लोष करुन दुसर्‍या दिवशी नक्की काय घडले, याचा शोध पोलिस घेतीलच, असे आनंद परांजपे यांनी सांगितले. (Silent protests of NCP in Thane over attack on Sharad Pawars house)

इतर बातम्या

Megablock : प्रवाश्यांनो लक्ष असू द्या! मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Anand Paranjpe: तर आम्हीही दुप्पट चोप देऊ शकतो; आनंद परांजपे यांचा मनसेला इशारा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.