करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी ‘मनसे’तून जोरकस चढाई…!

राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय. ईडीची एक नोटीस आली आणि राज सुतासारखे सरळ झाले. इतक्या दिवस मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे राज, आता चक्क मोदींचे गुणगाण करतायत, असा आरोप होतोय. या साऱ्यांना राज काय उत्तर देणार, याची उत्सुकताय.

करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी 'मनसे'तून जोरकस चढाई...!
राज ठाकरेंची आज सायंकाळी ठाण्यात सभा होतेय.
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:19 PM

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येतात. ते पाहतात. घणाघाती बोलतात. मैदान मारतात. पुन्हा कित्येक दिवस त्यांच्या सभेची चर्चा होत राहते. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. त्यामुळेच त्यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावरून घेतलेली सभा आणि कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यातच मंगळवारी (12 एप्रिल) सायंकाळी ठाण्यात (Thane) पुन्हा एकदा त्यांची झंझावाती सभा होतेय. ते या सभेत काय बोलणार याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागलीय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी करारा जवाब मिलेगा…म्हणत राज यांच्यावर टीका करणाऱ्यांवर जोरकस चढाई केलीय. राज यांच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यातल्या एका व्हिडीओ जाहिरातीतून उत्तर देत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर जोरदार वातावरण निर्मिती सुरू केलीय.

काय आहे जाहिरात?

सध्या राज यांची एक जाहिरात सोशल मीडियावरून फिरतेय. त्यात हजारो जणांचा जण समुदाय जमला आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेक बाइट दाखवले जातात. त्यामध्ये राज यांच्या मशिदीवरील भोंग्यावर आणि त्यांच्या भूमिकेवर हे एकेक नेते टीका करतायत. या एकेका बाइटनंतर एकेक वाक्य उच्चारले जाते. त्यातून पगला गए है…खलबली मच गई है…बदहवासी छाई है…मगर आसमान में थुकनेवालो को शायद ए पता नहीं है की, पलट के थूक उन्ही पे चेहरे पर गिरेगी. करारा जवाब मिलेगा, अशा इशारा देण्यात आला आहे.

राज काय बोलणार?

राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय. ईडीची एक नोटीस आली आणि राज सुतासारखे सरळ झाले. इतक्या दिवस लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आता तेच राज चक्क मोदींचे गुणगाण करतायत. स्वतः कडवे हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवत आहेत. मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आवाहन करत आहेत. या साऱ्यावरूनही ते टीकेचे धनी होतायत. या आरोपांना राज काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे. इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.