AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा, लोकल ट्रेनच्या लांबच लांब रांगा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे लोकल ट्रेनच्या एकामागे एक रांगा लागल्या आहेत.

मोठी बातमी! मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा, लोकल ट्रेनच्या लांबच लांब रांगा
| Updated on: Oct 01, 2024 | 9:02 PM
Share

मुंबई लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. कारण लाखो प्रवासी मुंबईने दररोज प्रवास करतात. लोकल ट्रेन ही मुंबई आणि उपनगराला जोडणारी महत्त्वाची दुवा आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने दीड ते दोन तासांचा प्रवास करुन आपापल्या कार्यालयात कामासाठी जातात. ते दररोज लोकल ट्रेनने ये-जा करतात. मुंबईत अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. मंत्रालय आहे. याशिवाय अनेक पर्यटक मुंबईत येतात. त्यामुळे मुंबई लोकल थांबली तर लाखो प्रवासी एकाच ठिकाणी स्तब्ध होतात. लाखो नागरीक हे मुंबई लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतात. त्यामुळे मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली तर त्याचा मोठा फटका या लाखो प्रवाशांना बसतो. आजदेखील असाच प्रकार मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.

मध्य रेल्वेच्या मार्गाने धिम्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. कारण रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा या मार्गावर झाला आहे. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे अनेक प्रवासी हे आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघतात. त्यामुळे या लाखो प्रवाशांना या वाहतूक खोळंबाचा फटका बसला आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतुकीच्या या खोळंब्यामुळे ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्या स्लो मार्गावर येणाऱ्या लोकल ट्रेन एकामागे एक उभ्या आहेत. बराच वेळ लोकल ट्रेन सुरु न झाल्यामुळे कामावरून परतणाऱ्या चाकरमानींसह रेल्वे प्रवाशांनी जीव धोक्यात टाकत रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास करत जाण्याचा मार्ग अवलंबला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचं कामी हाती घेण्यात आलं आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. रात्रीचा वेळ असल्याने या वाहतुकीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत काय माहिती दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.