Thane : ठाणे महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम; अनधिकृत बॅनर, होर्डिंगवरही कारवाई

| Updated on: Feb 03, 2022 | 8:17 PM

कोलशेत ढोकाळी रोडवरील होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नव्याने डीपी रोड होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्याचबरोबर बाधितांना देखील लवकरात लवकर नियोजन केले जातील असे पालिका आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांनी सांगितले आहे.

Thane : ठाणे महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम; अनधिकृत बॅनर, होर्डिंगवरही कारवाई
ठाणे महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम
Follow us on

ठाणे : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियान(Clean Survey Campaign) अंतर्गत ठाणे महापालिका हद्दीतीतील आनंद नगर टोल नाका ते तीन हात नाकापर्यंत ठाणे महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात 225 सफाई कर्मचारी तसेच स्वच्छता गाड्या आणि घंटा गाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारची स्वच्छता मोहीम ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनरमुळे विद्रुपीकरण होत असल्याने असे अनधिकृत बॅनर देखील महापालिकेकडून काढण्यात आले. तसेच विभागातील झोपडपट्टी व दाट लोकवस्तीत वेळोवेळी स्वच्छता सुरु आहे आणि दरोरोज अशा ठिकाणी स्वछता होत असल्याचे यावेळी पालिका आयुक्त विपीन शर्मा(Vipin Sharma) यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आनंदनगर चेक नाका ते तीन हात नाका परिसरातील स्वच्छता कामाची पाहणी केली. (Cleaning campaign under Swachh Survey 2022 on behalf of Thane Municipal Corporation)

यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी हळदेकर आदी उपस्थित होते. “स्वच्छ सर्वेक्षण 2022”, माझी वसुंधरा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था, पाणी पुरवठा, साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याचे काम व्यापक प्रमाणात सुरू आहे.

शहरातील शौचालय दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये खर्च

शहरातील शौचालयांचे दुरुस्तीकरण सुरु आहे. याचबरोबर पालिकेच्या वतीने 18 कोटी इतके पैसे यावर खर्च होणार असल्याचे देखील यावेळी आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले. तसेच कोलशेत ढोकाळी रोडवरील होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नव्याने डीपी रोड होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्याचबरोबर बाधितांना देखील लवकरात लवकर नियोजन केले जातील असे पालिका आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांनी सांगितले आहे. तर येणाऱ्या बजेटबाबत पालिकेला देखील निधी जास्तीत जास्त मिळेल अशी अपेक्षा असल्याचे पालिका आयुक्त यांनी सांगितले आहे. (Cleaning campaign under Swachh Survey 2022 on behalf of Thane Municipal Corporation)

इतर बातम्या

TMC Commissioner : ठाण्यातील रस्ता रुंदीकरण कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

दिवा येथे अनधिकृत इमारतींवर हातोडा; एक पोकलेन, 3 गॅसकटर, 80 कामगारांच्या फौजफाट्यासह पालिकेची जम्बो कारवाई