AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrikant Shinde : भाजपच्या माजी नगरसेवकाकडून खासदार श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, बॅनरची सर्वत्र चर्चा

कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी भला मोठा बॅनर लावला आहे. कल्याणचे खासदार शिंदे यांचा 4 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. दया गायकवाड यांनी जो बॅनर लावला आहे. तो केवळ शुभेच्छांचा बॅनर नसून खासदारांकडून सुरु असलेल्या विकास कामांचे फोटोसुद्धा लावला आहे.

Shrikant Shinde : भाजपच्या माजी नगरसेवकाकडून खासदार श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, बॅनरची सर्वत्र चर्चा
भाजपच्या माजी नगरसेवकाकडून खासदार श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 4:49 PM
Share

कल्याण : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे चांगेल व्यक्तिमत्व आहे. काम करणारा माणूस आहे. रात्री बेरात्री आम्ही त्यांना काम करताना बघितले असे म्हणत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे खंदे समर्थक भाजपच्या माजी नगरसेवक दया गायकवाड (Daya Gaikwad) यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना बॅनर लावून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर या बॅनरवर खासदारांच्या विकास कामांचे फोटो सुद्धा लावले आहेत. हा बॅनर कल्याण डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत गेले आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकाने लावलेला बॅनर हा भाजपला जास्त बोचणारा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची प्रभाग रचना नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवरुन शिवसेना भाजप मनसेत आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. (Unique birthday wish to MP Shrikant Shinde from a former BJP corporator in kalyan)

केडीएमसीत सेना-भाजपमध्ये जुंपली असतानाच गायकवाड यांची बॅनरबाजी

प्रभाग रचनेवरुन भाजप आणि मनसे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. केडीएमसीत शिवसेना भाजपमध्ये चांगलीच जुंपली असताना भाजपच्या एका माजी नगरसेवकाने खासदार शिंदे यांना एक अनोखी शुभेच्छा दिली आहे. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी भला मोठा बॅनर लावला आहे. कल्याणचे खासदार शिंदे यांचा 4 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. दया गायकवाड यांनी जो बॅनर लावला आहे. तो केवळ शुभेच्छांचा बॅनर नसून खासदारांकडून सुरु असलेल्या विकास कामांचे फोटोसुद्धा लावला आहे. याबाबत स्पष्टीकरण देत दया गायकवाड यांनी सांगितले की, खासदार श्रीकांत शिंदे चांगले व्यक्तिमत्व आहे. काम करणारा माणूस आहे. रात्री बेरात्री त्यांना कामासाठी उभे राहताना पाहिले आहे. मी हा बॅनर भाजपचा म्हणून लावलेला नाही. त्यावर भाजपचा उल्लेख बॅनरवर नाही. मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नाही. केवळ शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकारण आणि संबंध वेगळी गोष्ट

याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे म्हणणे आहे की, राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळी गोष्ट आहे. एखाद्याचा बॅनर लावला त्यात राजकीय भाषा करु नये. यासंदर्भात मी माहिती घेतो त्यानंतर बोलतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र भाजपच्या तीन नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेच प्रवेश केला होता. आता दया गायकवाड यांनी जो बॅनर लावला आहे. त्यावरुन राजकीय संकेत काय मिळतात हे सांगण्याची गरज नाही. (Unique birthday wish to MP Shrikant Shinde from a former BJP corporator in kalyan)

इतर बातम्या

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?

Parambir Singh: आरोपी बचावासाठी इतरांची नावं घेत असतो, राऊतांनी परमबीर सिंगांचे आरोप फेटाळले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.