ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने संपूर्ण ठाण्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे मोठमोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. साऊथ सुपरस्टारचे लावतात तसे हे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. हे कटआऊट्स ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. या शिवाय आणखी एक पोस्टर्स ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे. हे पोस्टर्स म्हणजे एक व्यंगचित्र आहे. त्यावर भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे ठाण्यात सध्या या दोन्ही पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.