Thane Corporator Rada : ठाण्यात माजी नगरसेवकांमध्ये भररस्त्यात राडा, शिवीगाळचा व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर

| Updated on: May 06, 2022 | 10:10 PM

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भररस्त्यातच विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच नम्रता फाटक यांनी रेपाळे यांना मारण्यासाठी चप्पल उगारली आहे. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Thane Corporator Rada : ठाण्यात माजी नगरसेवकांमध्ये भररस्त्यात राडा, शिवीगाळचा व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर
निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर 
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : ठाण्यातील वागळे परिसरात रस्त्यावर दोन सेना माजी नगरसेवकांमध्ये वाद झाला. अश्लील भाषेत शिवीगाळ करताना नगरसेवकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी नगरसेवक विकास रेपाळे (Vikas Repale) आणि माजी नगरसेविका नम्रता फाटक (Namrata Phatak) यांच्यामध्ये हा वाद झाला. नेमका कशामुळे वाद झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र समाज माध्यमातही चर्चेला उधाण आले आहे. यावर पालकमंत्री मंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भररस्त्यातच विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच नम्रता फाटक यांनी रेपाळे यांना मारण्यासाठी चप्पल उगारली आहे. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकप्रतिनिधींच्या या कृत्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. (Controversy erupts among former corporators over development work in Thane, video goes viral on social media)

ठाण्यातील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

ठाण्यात शिवसेनेच्या माजी नागरसेवकांचा आपापसातला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि नम्रता फाटक आणि राजू फाटक हे एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, धक्काबुक्की, झटापट झाल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून सध्या हा व्हिडीओ ठाणेकर आणि राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

मेट्रो उड्डानपुलाखाली सुरु असलेल्या शहर सौंदर्यीकरणावरुन वाद

शिवसेना माजी नगरसेवक विकास रेपाळे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर, राजू फाटक हे सेना आमदार रवींद्र फाटक यांचे बंधू आहेत. यामुळे शिंदे आणि फाटक गटातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. ठाण्यातील रहेजा येथील मेट्रोच्या उड्डानपुलाखाली शहर सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून या कामावरूनच हा वाद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हा वाद झाला आहे. हा वाद एवढा विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांना अश्लील भाषेत रस्त्यावरच शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात झटपटही झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने या वादाची जोरदार चर्चा ठाण्यात सुरु आहे. माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. आताचा हा वाद एकाच ठिकाणी विकासकामांतर्गत बांधण्यात आलेल्या ओपन जिम आणि पुटपाथ सुशोभीकरणावरून शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत वाद हा समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही गटाकडून एकमेकांवर आगपाखड

या प्रकरणाबाबत माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना विचारणा केली असता आमदार रवींद्र फाटक यांचे बंधू राजू फाटक आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नम्रता फाटक यांनी अगोदर मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला मी त्याला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला तसेच याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार रवींद्र फाटक यांना याबाबतची तक्रार देखील केली असुन विरोधकांना हाताशी घेऊन या प्रकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा कट सध्या सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर राजू फाटक आणि नम्रता फाटक यांना याबाबत संपर्क केला असता आम्ही आमच्या वरिष्ठांना या बाबत तक्रार केली असुन ते योग्य ती कारवाई करतील असं सांगत माध्यमासमोर येण्यास त्यांनी टाळलं. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात त्यांच्याच पक्षातील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने ते या प्रकरणाकडे कशाप्रकारे बघतात किंवा या माजी नगरसेवकांवर काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं राहणार आहे. (Controversy erupts among former corporators over development work in Thane, video goes viral on social media)