ठाण्यात बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकडे भाविकांचा ओघ, पाचव्या दिवशी तब्बल 14 हजार 123 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

श्री गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 14 हजार 123 गणेशमूर्तींसह 964 गौरींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले.

ठाण्यात बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकडे भाविकांचा ओघ, पाचव्या दिवशी तब्बल 14 हजार 123 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 3:03 PM

ठाणे : श्री गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 14 हजार 123 गणेशमूर्तींसह 964 गौरींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे आणि गौरीचे विसर्जन केले. तसेच महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 600 गणेशमूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. तर पाचव्या दिवशी 3668 नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमूर्तींचे विसर्जन केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.

ठाण्यात कोणकोणत्या भागात कृत्रीम तलावांची व्यवस्था?

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण 13 कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील 14 हजार 123 घरगुती गणेशमूर्ती, 964 गौरींचे भावपूर्ण विसर्जन

यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. यावर्षी पाचव्या दिवशी 14 हजार 123 घरगुती गणेशमूर्ती, 964 गौरी, 87 सार्वजनिक गणेशमूर्ती तसेच 600 स्विकृत मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.

कोणत्या ठिकाणी किती गणेशमूर्तींचे विसर्जन विसर्जन?

शहरातील मासुंदा आणि आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी 1936 घरगुती गणेश मूर्तींचे आणि 265 गौरींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात 713 घरगुती गणेश मुर्तींचे, 17 गौरींचे आणि 2 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये 490 गणेशमूर्तींचे आणि 53 गौरी, रेवाळे कृत्रिम तलाव येथे 580 घरगुती गणेशमूर्ती, 3 सार्वजिनक गणेशमूर्ती आणि 37 गौरी, मुल्लाबाग येथे 655 घरगुती गणेश मुर्ती, 3 सार्वजनिक गणेश मुर्ती आणि 32 गौरी, खिडकाळी तलाव येथे 113 घरगुती गणेशमूर्ती आणि 3 गौरी, शंकर मंदीर तलाव येथे 216 घरगुती गणेशमूर्ती, 7 सार्वजिनक गणेशमूर्ती आणि 17 गौरी, उपवन तलाव येथे 1801 घरगुती गणेशमूर्ती, 7 सार्वजिनक गणेशमूर्ती आणि 17 गौरींचे विसर्जन करण्यात आले.

पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे 711 घरगुती गणेशमूर्ती, 30 सार्वजनिक गणेशमूर्ती, 66 गौरी आणि 600 स्वीकृत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट 1 येथे 342 घरगुती गणेश मूर्ती, 2 सार्वजनिक गणेश मुर्ती व 14 गौरी तसेच गायमुख घाट 2 येथे 83 घरगुती गणेश मूर्ती व 5 गौरींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे 524 घरगुती गणेश मुर्ती, 2 सार्वजिनक गणेशमूर्ती व 92 गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट 1 येथे 1540 घरगुती गणेश मुर्ती व 104 गौरी, रायलादेवी घाट 2 येथे 769 घरगुती गणेशमूर्ती आणि 40 गौरी, कोलशेत घाट 1 व 2 येथे 1120 घरगुती गणेशमूर्ती, 13 सार्वजनिक गणेशमूर्ती व 105 गौरी, आत्माराम बालाजी घाट येथे 96 घरगुती गणेश मूर्ती व 2 गौरी तसेच दिवा विसर्जन घाट येथे 783 घरगुती गणेशमूर्ती, 13 सार्वजिनक गणेशमूर्ती व 28 गौरींचे विसर्जन करण्यात आले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत पाचव्या दिवशी 3668 नागरिकांनी बुकिंग करून प्रत्यक्षस्थळी विसर्जन केले.

आयुक्त आणि महापौरांकडून आभार व्यक्त

दरम्यान राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रियेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये स्वयंसेवक, महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या सहकार्याबद्दल देखील महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा :

रस्त्यात मोबाईलवर बोलताना सावध रहा! पुण्यात महिलांचे फोन चोरणाऱ्या चौघांच्या टोळीचा पर्दाफाश

परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी नवी मुंबई महापालिकेची विशेष लसीकरण मोहीम

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.