Shivsena : पक्ष फुटला, आता शाखांचीही फाळणी; डोंबिवलीत शिंदे-शिवसेना गटातल्या राड्यानंतर एकाच शाखेचं विभाजन

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला.

Shivsena : पक्ष फुटला, आता शाखांचीही फाळणी; डोंबिवलीत शिंदे-शिवसेना गटातल्या राड्यानंतर एकाच शाखेचं विभाजन
शिवसेनेच्या डोंबिवली शाखेत राडाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 10:22 AM

डोंबिवली, ठाणे : शिवसेनेच्या (Shivsena) डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळविण्यासाठी मंगळवारी शिंदे आणि ठाकरे समर्थक आपापसांत भिडले. या राडेबाजीनंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शिंदे आणि ठाकरे गटात विभाजन झाल्याचे पहायला मिळत आहे. येथील शाखेमध्ये चार खोल्या असून यातील मध्यभागी असलेल्या दोन खोल्यांवर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे कार्यालय असून त्याबाजूला बैठक खोली आहे. या दोन्ही कार्यालयांवर शिंदे गटाने ताबा मिळविला आहे. तर सुरुवातीची आणि शेवटची अशा दोन खोल्या या ठाकरे समर्थकांच्या ताब्यात आहेत. दोन ते तीन समर्थक केवळ शाखांत बसलेले असून पोलिसांचा (Police) देखील खडा पहारा शाखेच्या बाहेर आहे. जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत शांततेची भूमिका सध्या दोन्ही गटांनी घेतल्याचे चित्र शाखेत दिसून येत आहे.

काय वाद?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. या वेळी यावेळी महिला शिवसैनिक, तरूण आणि पुरुष शिवसैनिकांनी शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना विरोध दर्शवला. तो विरोध करत असताना शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले आहेत. तब्बल अर्धा तास शाखेत राडा सुरू होता. यावेळी दोन्ही समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाणही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करत असलेली परिस्थिती पोलिसांनी पाहताच बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी हा सर्व प्रकार झाला.

हे सुद्धा वाचा

दादागिरी आणि धमकी

खासदार श्रीकांत शिंदे आणि रमेश म्हात्रे यांची माणसे या ठिकाणी आली आणि तुम्ही सगळे बाहेर चला. इथे कोणीच थांबायचे नाही, अशा पद्धतीने दादागिरी करत काही पदाधिकाऱ्यांवर हात उचलला. ढकलाढकली केली. माझ्या डोक्यावरती पण फटके मारले शर्ट खेचला. काही महिलांवरही हात उचलले. घाणेरड्या पद्धतीने वक्तव्य केले. त्याबरोबर ही शाखा श्रीकांत शिंदेची आहे. इकडे कोणी थांबायचे नाही. बाहेर पडा, नाहीतर मारून टाकू, अशा पद्धतीचे वक्तव्य केले, असे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी सांगितले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.