AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नृत्यांगना राधा पाटीलच्या सोलापूर कार्यक्रमाला तूफान गर्दी, 'त्या' विधानाने झाली ट्रोल...

नृत्यांगना राधा पाटीलच्या सोलापूर कार्यक्रमाला तूफान गर्दी, ‘त्या’ विधानाने झाली ट्रोल…

| Updated on: Dec 27, 2025 | 3:42 PM
Share

नृत्यांगना राधा पाटील सोलापूर येथील कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. तिच्या डान्सला प्रचंड गर्दी झाली, पण 'लाजच नाही' या विधानामुळे ती ट्रोल झाली. सोलापूरच्या कार्यक्रमातील तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

राज्यातील अनेक नृत्यांगना प्रसिद्ध आहेत. गौतमी पाटील हिच्या नृत्याचे तर अनेक फॅन आहेत. पण तिच्याप्रमाणेच आणखी एक नृत्यांगना खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे प्रख्यात डान्सर राधा पाटील. तिचा डान्स, अदा, याप्रमाणेच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही ती खूप चर्चेत असते. नुकताच या राधा पाटीलचा सोलापूरजवळ नृत्याचा कार्यक्रम झाला, तिथे तूफान गर्दी होती. तिथे तिचा डान्स तर खूप गाजला, पण त्याच वेळी तिने केलेल्या एका विधानामुळे ती चांगलीच ट्रोलही झाली.

नेमकं झालं तरी काय ?

सोलापूर पुणे महामार्गावरील टेभुर्णीत नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.नेहमीप्रमाणे तिच शो हाऊसफुल्ल होता, तुडुंब गर्दी झाली होती. या कार्यक्रमात राधा पाटील व तिच्य सहकालाकारांनी हिंदी मराठीच्या गाण्यावर तूफान डान्स केला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. एवढंच नव्हे तर तिच्या गाण्यावर उपस्थित प्रेक्षकांनी , चाहत्यांनी एकमेकांना डोक्यावर घेऊन ताल धरत नृत्यही केलं. एकंदरचं हा कार्यक्रम खूप हिट ठरला, त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला.

मार खाणार का ? लाजच नाही..

मात्र याच कार्यक्रमात तिने केलेल्या विधानामुळे ट्रोलही होत आहे. तिने चक्क प्रेक्षकांची लाजच काढल्याचे दिसून आलं. कार्यक्रमातील उपस्थितांशी ती संवाद साधत होती. तेव्हा तिने विचारलं, कसं वाटतंय ? चाहत्यांनी प्रतिसाद दिल्यावर ती हसू लागली. नंतर तिने विचारलं, डान्स करायचा आहे का ? प्रेक्षक म्हणाले हो…. पुढे तिने विचारलं पोलीस मारायला आले तर ? मार खाल ना ? सगळे मार खाणार ? हात वर करा कोण-कोण मार खाणार ? ते ऐकून उपस्थितापैकी अनेकांनी मजेतच त्यांचा हात वर केला. तो प्रतिसाद पाहून राधा पुन्हा हसत हसत म्हणाली.. लाजच नाही ! तिचं हे विधान मजेत असलं तरी काही जण त्यावरून तिला ट्रोल करताना दिसत आहेत. राधाने लाज काढल्याचा विषय कार्यक्रमात ट्रोल झाल्याचा पहायला मिळाला.

कोण आहे राधा पाटील ?

गौतमी पाटीललप्रमाणेच तरूणाईन राधा पाटील ही डान्सर खूप फेमस आहे. इन्स्टाग्रामवर राधा पाटील मुंबईकर या नावाने ती चांगलीच प्रसिद्ध आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना तरुणांची प्रचंड गर्दी असते. दोनेक वर्षांपूर्वी राधा पाटील हिने गौतमी पाटीलवर निशाणा साधत तिच्यावर टीका केली होती. टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत राधा पाटीलने गौतमीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

” लावणीचे पावित्र्य जपण्यासाठी या क्षेत्रात नव्याने आलेल्या कलाकारांनी कार्यक्रमात अश्लीलपणा करु नये. लावणीच्या कार्यक्रमात सध्या जो काही अश्लीलपणा सुरु आहे, तो नाही झाला पाहिजे. असे प्रकार बंद झाले पाहिजेत. नविन येणाऱ्या कलाकारांच्या घाणेरड्या डान्सवर समाजातून टीका होणारच ना. सुरेखा पुणेकर सांगतात त्याप्रमाणे, असं जर होत राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही,” अशी अप्रत्यक्ष टीका राधाने गौतमीवर केली होती. “शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते. मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काय माहीत नाही. मी तर खानदानी पाटील आहे. पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते,” असंही ती पुढे म्हणाली होती.

त्यानंतर गेल्या वर्षी तिने पुन्हा गौतमीवर टीकास्त्र सोडलं होतं. “ गौतमी पाटील हिच्यासोबत माझी स्पर्धा नाही. घाण व्हिडीओ काढून कुणीही व्हायरल होऊ शकतं. आम्ही साडी नेसून व्हायरल झालो आहोत. हे लोकांनादेखील दिसत आहे की, मी आजपर्यंत कशी व्हायरल झाले ते. आता बघू किती प्रेम मिळतं”, अशा शब्दांत राधा पाटील हिने गौतमीला टोला लगावत तिच्यावर टीका केली होती.

Published on: Dec 27, 2025 03:41 PM