Kalicharan Baba: कालीचरण बाबाच्या अडचणीत वाढ; महात्मा गांधी, पंडित नेहरुंविषयी वादग्रस्त विधानाबाबत कल्याणमध्ये गुन्हा दाखल

| Updated on: Jan 04, 2022 | 8:19 PM

कार्यक्रमा दरम्यान तथाकथीत कालीचरण बाबा याने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. एका विशिष्ट धर्माविषयी वादग्रस्त विधान केले. या कार्यक्रमानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात केवळ कारवाई केली होती.

Kalicharan Baba: कालीचरण बाबाच्या अडचणीत वाढ; महात्मा गांधी, पंडित नेहरुंविषयी वादग्रस्त विधानाबाबत कल्याणमध्ये गुन्हा दाखल
कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us on

कल्याण : आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणारा आणि सध्या रायपूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कालीचरण बाबा विरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तथाकथीत बाबाच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. त्यामुळे बाबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जाहिर कार्यक्रमात महात्मा गांधी आणि पंडित नेहरुंबाबत वादग्रस्त विधान केले

10 डिसेंबर रोजी कल्याण पूर्व भागात एका खाजगी संस्थेने अभिजीत सरक उर्फ कालीचरण बाबा याच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमा दरम्यान हजारो नागरिक उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधींनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमा दरम्यान तथाकथीत कालीचरण बाबा याने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. एका विशिष्ट धर्माविषयी वादग्रस्त विधान केले. या कार्यक्रमानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात केवळ कारवाई केली होती. भादवी 188, 241 आणि साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती. यात केवळ आयोजकांना आरोपी केले होते.

कालिचरणच्या भाषणाचा व्हिडिओ मिळाल्यानंतर गुन्हा दाखल

रायपूर पोलिसांनी जेव्हा कालीचरण विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर कल्याणमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी जोर धरु लागली होती. या प्रकरणी एसटीपीआय पार्टीचे फरदीन पैकर आणि राष्ट्रवादीचे नोवेल साळवे, मनोज नायर, पत्रकार बाळकृष्ण मोरे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पोलिसांकडे केली होती. 10 डिसेंबरचा कालीचरणच्या भाषणाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर अखेर कालीचरणच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आधीच्या एफआरआयमध्ये कालीचरण बाबाचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. भादवी 295 अ, 298, 153 अ, 505 ब ही कलमे बाबाच्या विरोधात लावण्यात आली आहेत. कालीचरणच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई कोळसेवाडी पोलीस करणार आहेत. बाबाचा ताबा घेण्यास पोलिसांचे एक पथक छत्तीसगडला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रंनी दिली आहे. (Filed a case against Kalicharan Baba in Kalyan regarding controversial statement about Mahatma Gandhi, Pandit Nehru)

इतर बातम्या

Ambernath: अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी भाजला, प्रकृती गंभीर, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

KDMC: कल्याण-डोंबिवलीत लसीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेना आमने-सामने