AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manikrao Kokate : माणिकरावांनंतर क्रीडा खातं कुणाकडे? 6 नावे चर्चेत, एका नावाने भुवया उंचावल्या

बनावट कागदपत्रांमुळे सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाली असून, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते रुग्णालयात असून, अटकेची शक्यता आहे. त्यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक खातं तात्पुरतं अजित पवारांकडे आहे. स्थानिक निवडणुका संपल्यावर नव्या मंत्र्याची निवड अपेक्षित असून, जातीय समीकरणाचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

Manikrao Kokate : माणिकरावांनंतर क्रीडा खातं कुणाकडे? 6 नावे चर्चेत, एका नावाने भुवया उंचावल्या
माणिलकारव कोकाटे यांचं खातं कोणाला मिळणार ?
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 8:38 AM
Share

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात न्यायलयाने 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)  हे अडचणीत सापडले. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी मोबाईलवर रमी खेळतानाचा वाद आणि आता सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरले, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये सतत वाढ होतानाच दिसत आहे. सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल असले तरी त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने जी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती ती सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अखेर आता कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात होते, त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचाही राजीनामा दिला. कोकाटे याचं खातं काढून घेतल्यानंतर सध्या ते अजित पवार यांच्याकडे आहे, तर कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची निवड कधी होणार, ते खातं कोणाल मिळणार असे अनेक सवाल उपस्थित होत असून याप्रकरणी आता एक नवी अपडेट समोर आली आहे.

क्रीडा खातं कोणाकडे? कधी होणार निर्णय ?

माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचा समावेश आहे.

त्यामुळे आता अजित पवार हे माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला मंत्रीपदासाठी त्यांची पसंती असेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकटेंच्या जागी जर मराठा समाजातील नव्या चेहऱ्याचा विचार केला तर प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप, सुनील शेळके या तीन नावांचा सुद्धा विचार होऊ शकतो.

 धनंजय मुंडेच्या नावाने उंचावल्या भुवया

धनंजय देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, तो धनंजय मुंडे यांच्या निकटचा सहकारी आहे. गेल्या वर्षी झालेल्या या हत्याप्रकरणानंतर मोठा गदारोळ झाला, अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या हत्याप्रकरणाचा अद्यापही निकाल लागलेला नाही, मात्र तरीही धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल का? कोकाटे यांच्या जागी त्यांना हे मंत्रीपद देण्यात येईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतर माजी मंत्र्यांसह धनंजय मुंडे यांचं नावही मंत्रीपदासाठी चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी