ना करवाढ, ना दरवाढ, केडीएमसीचं ‘मिशन हेल्थ’; 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा 1773 कोटी 56 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला.

ना करवाढ, ना दरवाढ, केडीएमसीचं 'मिशन हेल्थ'; 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर
ना करवाढ, ना दरवाढ, केडीएमसीचं 'मिशन हेल्थ'; 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 2:56 PM

कल्याण: गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने (kdmc) आज आपला अर्थसंकल्प सादर केला. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (vijay suryawanshi) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा 1773 कोटी 56 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही. तसेच या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ न केल्याने कल्याण-डोंबिवलीतील रहिवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्त सूर्यवंशी हे महापालिकेचे प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी हा अर्थसंकल्प सादर करून आपल्या अधिकारातच अर्थसंकल्पाला तात्काळ मंजूरीही दिली. केडीएमसीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जात आहे.

यंदाचा अर्थसंकल्प 1773 कोटी 56 लाख जमेच्या बाजूचा असून विविध कामाकरीता खर्चाची तरतूद म्हणून 1774 कोटी रुपये ठवली आहे. यंदाच्या बजेटमध्ये नागरिकांवर कोणतीही करदरवाढ लादलेली नाही. मात्र येत्या वर्षातही आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं. या अर्थसंकल्पात शहरातील उद्याने विकसीत करण्यावरही भर देण्यात आला आहे. खेळाडूंकरीता मैदाने विकसीत करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच शहरातील पाच तलावांचा विकास करण्यात येणार आहे.

पालिका शाळेत सीबीएससीचा अभ्यासक्रम

त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महापालिकेच्या शाळा सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्याची योजना महापालिकेच्या आयुक्तांनी आखली आहे. कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प राबवला जाणार आहे. महापालिकेसह आसपासच्या महापालिकांना समावून घेणारी घनकचरा व्यवस्थापनाची क्लस्टर योजना राबविण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

एकही कोरोना रुग्ण नाही

महापालिका हद्दीत 13 मार्च रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. मात्र आज महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे. याविषयी आयुक्ता डॉ विजय सूर्यवंशी यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, रुग्णसंख्या नसली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणावर सोमवारी विधासभेत बिल आणणार, अजित पवारांची घोषणा; मध्यप्रदेश फॉर्म्युल्याचाही विचार होणार

दिलासादायक बातमी ! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियाच्या 130 बस तयार, रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राची माहिती

VIDEO: प्रसंगी पालिका, जिल्हा परिषद, पंचायतीवर प्रशासक नेमू, पण ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही, अजितदादांची ग्वाही

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.