Ambernath Firing : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, थोडक्यात बचावला

| Updated on: Apr 24, 2022 | 7:00 PM

अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव परिसरात मुकुल पाल्म नावाची सोसायटी आहे. या सोसायटीत सफायर नावाच्या इमारतीत तळमजल्यावर बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांचं ऑफिस आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कमरुद्दीन हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना ऑफिसच्या खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

Ambernath Firing : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, थोडक्यात बचावला
अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
Image Credit source: TV
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका बांधकाम व्यावसायिका (Businessman)वर अज्ञातांनी गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली. या गोळीबारात बांधकाम व्यावसायिक थोडक्यात बचावला असून याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबाराची ही घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. कमरुद्दीन खान असे हल्ला करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या प्रकरणात पोलिसांनी आयपीसी 506 (2) आणि आर्म्स ऍक्ट 3 (25) नुसार गुन्हा दाखल करत तपासाला सुरु केला आहे. हा हल्ला व्यावसायिक वादातून झाला की वैयक्तिक वादातून याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. (In Ambernath a builder was shot dead by unknown accused)

सुदैवाने कमरुद्दीन खान बचावले

अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव परिसरात मुकुल पाल्म नावाची सोसायटी आहे. या सोसायटीत सफायर नावाच्या इमारतीत तळमजल्यावर बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांचं ऑफिस आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कमरुद्दीन हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना ऑफिसच्या खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. मात्र या गोळ्या कमरुद्दीन यांना न लागता भिंतीवर लागल्या. याप्रकरणी कमरुद्दीन शेख यांनी एका संशयिताचं नाव घेतलं असून याच परिसरातल्या एका जागेवरून कमरुद्दीन खान यांचे गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या एका बांधकाम व्यावसायिकासोबत वाद आहेत. त्यामुळे हा हल्ला नेमका त्याच वादातून झालाय? की यामागे अन्य काही कारण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली. (In Ambernath a builder was shot dead by unknown accused)

इतर बातम्या

Bihar Murder : बिहारमध्ये डबल मर्डर, पती-पत्नीच्या संशयास्पद हत्येने खळबळ

Pune crime : भाड्यानं घर पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा बलात्कार; रिअल इस्टेट एजंटला पुण्याच्या विमानतळ पोलिसांनी केली अटक